कोलकाता : आयसीसी वर्ल्ड कप २०२३ मध्ये आज कोलकाताच्या ईडन गार्डनवर दक्षिण अफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होणार आहे. दक्षिण अफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, प्रथम फलंदाजी करताना दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांना जेरीस आणण्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना चांगले यश आले आहे. ऑस्ट्रेलियाने ११ ओव्हरमध्ये त्यांचे ४ महत्त्वाचे फलंदाज तंबूत पाठवले आहेत. त्यानंतर सुद्धा साऊथ अफ्रिकेची फलंदाजी घसरत राहिली परंतु क्लासेन आणि डेव्हीड मिलरने चांगली भागीदारी करीत डावाला आकार दिला. परंतु, क्लासेनला बाद केल्यानंतर एकट्या मिलरने महत्त्वाची खेळी करीत दक्षिण अफ्रिकेला एका सन्मानजनक स्कोअरपर्यंत नेऊन ठेवले.
Bowled! Travis Head gets the huge wicket of Heinrich Klaasen in his first over – clean bowled! #CWC23
— cricket.com.au (@cricketcomau) November 16, 2023
South Africa in deep peril before rain halts play 👀#CWC23 | #SAvAUShttps://t.co/eQFviwYmYS pic.twitter.com/R2vwIgHHey
— ICC (@ICC) November 16, 2023
दक्षिण अफ्रिकेची सुरुवात खूपच निराशाजनक
आज दक्षिण अफ्रिकेची सुरुवात खूपच निराशाजनक राहिली. दक्षिण अफ्रिकेने प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय त्यांच्या पथ्यावर न पडल्याचे दिसून आले आहे. दक्षिण अफ्रिकेच्या पहिल्या फळीतील ४ फलंदाज पॉवर प्लेच्या आतमध्ये तंबूत परतले आहेत. सलामीला आलेली जोडी आज पूर्णत: निष्प्रभ ठरली आहे. आज त्यांच्या ११ ओव्हरमध्ये ४ विकेट गेल्याचे पाहायला मिळाले.
क्लासेन आणि डेव्हीड मिलरची भागीदारी ठरणार निर्णायक
दक्षिण अफ्रिकेची फलंदाजी घसरली असताना आता क्लासेन आणि डेव्हीड मिलर यांची भागीदारी महत्त्वाची ठरणार आहे. दोघांनी मिळून आतापर्यंत ४३ धावांची भागीदारी केली आहे.
क्लासेन आऊट
अखेर क्लासेन आणि डेव्हीड मिलर यांची जोडी फोडण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले आहे. ऑस्ट्रेलियालाच्या गोलंदाजांनी दक्षिण अफ्रिकेची गोलंदाजांचा धुव्वा उडाला आहे. आतापर्यंत दक्षिण अफ्रिकेच्या ६ विकेट गेल्याने त्यांचे कंबरडे मो़डले आहे.
दोन्ही संघांनी नऊपैकी सात सामने जिंकले
विश्वचषकाच्या साखळीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघांनी नऊपैकी सात सामने जिंकून, प्रत्येकी 14 गुणांची कमाई केली होती. पण नेट रनरेटच्या निकषावर दक्षिण आफ्रिकेनं गुणतालिकेत दुसरा आणि ऑस्ट्रेलियाने तिसरा क्रमांक पटकावला होता. पण, उभय संघांमध्ये झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाचा 134 धावांनी धुव्वा उडवला होता. आज ऑस्ट्रेलिया हिशोब चुकता करणार की आफ्रिका फायनलमध्ये पोहचणार ? हे काही तासांमध्येच समजणार आहे.