IND Vs PAK: महासंग्रामाला सुरुवात, टॉस जिंकत पाकिस्तानचा बॅटिंगचा निर्णय, भारतीय बॉलर्स सज्ज, फोटो सौजन्य : सोशल मीडिया
IND Vs PAK: दोहाच्या वेस्ट इंड पार्क इंटरनॅशनल स्टेडियममध्ये आज ACC Men’s Asia Cup Rising Stars मध्ये भारत ‘ए’ आणि पाकिस्तान ‘ए’ यांच्यात महासंग्राम रंगणार आहे. या सामन्याच्या टॉस जिंकत पाकिस्तानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. अशात लयात असलेल्या भारतीय गोलंदाजांकडून मागील सामन्याप्रमाणे कामगिरीची अपेक्षा आहे.
भारताच्या खेळाडूंचा विचार करता सध्या पहिल्या फळीपासून अखेरच्या फळीपर्यंत खेळपट्टीवर टिकतील अशा बॅटर्सचा भरणा आहे. मग त्यात वैभव सुर्यवंशी, अभिषेक शर्मा, आयुष बदोनी, मागील सामन्यातील शतकवीर कर्णधार तिलक वर्मा, कुमार कुशाग्र अशा खेळाडूंचा भरणा आहे.
दरम्यान, असे असले तरी नेपाळविरुद्ध म्हणावी तशी कामगिरी करू न शकलेल्या वैभव सूर्यवंशीकडे साऱ्यांच्या नजरा असतील. तसेच अभिषेक शर्माही नेपाळविरुद्ध म्हणावी तसी बॅटींग करू शकला नव्हता. त्यामुळे ही दोघ सलामीला येत काय धमाका करतात ते पाहणं उत्सुकतेचं ठरणा आहे.
तसेच गोलंदाजीत हर्षित राणा, प्रिन्स यादव या बॉलर्सकडून मागील सामन्यातील कामगिरीच्या पुनरावृत्तीची जबाबदारी असणार आहे. या दोघांनी नेपाळच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडत अवघ्या 26 धावांत गारद केले होते. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध हे कशाप्रकारे कामगिरी करतात ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच त्यांच्या साथीला शाहबाज अहमद, विपराज निगम हे देखील असणार आहेत.
दरम्यान, भारताने गटफेरीतील पहिल्या सामन्यात नेपाळचा तब्बल 306 धावांनी पराभव करत गुणतालिकेतील अव्वल स्थान गाठले आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना नेपाळसमोर 9 बाद 333 धावांचे आव्हान दिले होते. त्या धावांचा पाठलाग करत असताना भारताने नेपाळला 12 व्या ओव्हर्समध्येच 26 धावांत गारद केले. आता भारत तिच कामगिरी येथे करू पाहिल.
तर पाकिस्तानला पहिल्या सामन्यात युएईने चांगलेच रडवले. युएईने पाकिस्तानला 245 धावांतच गारद केले, तर या धावांचा पाठलाग करताना युएईच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांचा चांगलाच घाम गाळला. अखेर त्यांनी हा सामना 61 धावांनी जिंकला, पण युएईच्या रायझिंग स्टार्स खेळाडूंसमोर ते थोडे दबावात गेले होते.
भारत ‘ए’ संघ : वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, आयुष बडोनी, तिलक वर्मा (कर्णधार), कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), रिंकू सिंह, सूर्यांश शेडगे, शाहबाज अहमद, विप्रज निगम, हर्षित राणा, प्रिन्स यादव, तनुष कोटियन, प्रभसिमरन सिंग, हर्ष दुबे आणि अर्शद खान.
पाकिस्तान ‘ए’ संघ : शमिल हुसेन, माज सदाकत, रोहेल नझीर (यष्टीरक्षक), हसन नवाज, अब्दुल समद (कर्णधार), फरहान युसूफ, साद मसूद, मोहम्मद इम्रान रंधावा, अहमद दानियाल, सुफियान मुकिम, अली रझा, शहजैब खान, हैदर अली, मोहम्मद हसनैन आणि दानिश अझीझ.






