फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : आज संपूर्ण सोशल मीडियावर विराट कोहली आणि सॅम कॉन्स्टास यांच्यामध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्यात झालेल्या बाचाबाची चर्चा सुरु आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेमुळे भारताचा फलंदाज विराट कोहलीला आयसीसीने दंड ठोठावला आहे.
मेलबर्न कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी सॅम कोन्स्टासने केलेली आक्रमक फलंदाजी पाहून सगळेच थक्क झाले. या १९ वर्षीय ऑस्ट्रेलियन खेळाडूने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात जसप्रीत बुमराहसारख्या दिग्गज वेगवान गोलंदाजाला लक्ष्य केले आणि त्याच्या एका षटकात १८ धावा दिल्या. सॅम कॉन्स्टासने ६५ चेंडूत ६० धावांची शानदार खेळी केली आणि या खेळीदरम्यान तो आणि टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली यांच्यात जोरदार वाद झाला. खरं तर, बुमराहच्या षटकात कॉन्स्टासने १८ धावा केल्या, त्याआधी त्याच्या आणि विराटमध्ये संघर्ष झाला होता. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने यासाठी विराटला पूर्णपणे जबाबदार धरले आणि त्याच्या चिथावणीमुळेच दोघांमधील भांडण सुरू झाल्याचे सांगितले. ७ क्रिकेटने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये रिकी पॉन्टिंगने या सगळ्यात विराट कसा चुकला याचा पुरावा दिला आहे.
This is pure #ToughestRivalry vibes! 🥶#AUSvINDOnStar 👉 4th Test, Day 1 LIVE NOW! | #BorderGavaskarTroph pic.twitter.com/7m2ilANuu5
— Star Sports (@StarSportsIndia) December 26, 2024
रिकी पाँटिंग म्हणाला, ‘विराट कुठे चालला होता ते बघूया, विराट त्याच्या उजव्या बाजूच्या संपूर्ण खेळपट्टीवर चालत आला आणि कॉन्स्टासला चिथावणी दिली, त्यामुळे दोघांमध्ये भांडण झाले, काहीही असो, मला शंका नाही. ते’ विराट कोहलीने कॉन्स्टासच्या खांद्याला टक्कर दिली, त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. अंपायरलाही मध्यस्थी करण्यासाठी यावे लागले, तर उस्मान ख्वाजाने सॅम कॉन्स्टासला रोखले. मेलबर्न कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा निर्णय अगदी योग्य ठरला.
“विराट कुठे चालला आहे ते पहा. विराटने त्याच्या उजवीकडे एक संपूर्ण खेळपट्टी चालली आणि त्यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाली. माझ्या मनात काहीही शंका नाही.”
“Have a look where Virat walks. Virat’s walked one whole pitch over to his right and instigated that confrontation. No doubt in my mind whatsoever.”
– Ricky Ponting #AUSvIND pic.twitter.com/zm4rjG4X9A
— 7Cricket (@7Cricket) December 26, 2024
दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने सहा विकेट्सवर ३११ धावा केल्या होत्या. स्टीव्ह स्मिथ ६८ तर कर्णधार पॅट कमिन्स आठ धावा करून नाबाद परतला. कोंटासच्या ६० धावांच्या खेळीशिवाय मार्नस लॅबुशेनने ७२ धावांची खेळी खेळली, ॲलेक्स कॅरी ३१ धावा करून बाद झाला तर ख्वाजा ५७ धावा करून बाद झाला. भारताकडून जसप्रीत बुमराहच्या खात्यात तीन बळी गेले, तर आकाश दीप, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.