फोटो सौजन्य - सोशल मिडिया
क्रिकेट चाहते सध्या आशिया कप २०२५ च्या उत्साहात बुडाले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी होणार आहे. तर भारताचा अ संघ हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका खेळत आहे. भारताचा संघ आता काही दिवसांमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. त्याआधी, टीम इंडियाचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज केएल राहुलने इंडिया अ संघाकडून खेळताना ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध शानदार कामगिरी केली. त्याने दुसऱ्या डावात शानदार शतक पूर्ण केले. राहुलने शतक गाठण्यासाठी १३८ चेंडू घेतले, या काळात १२ चौकार मारले.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी राहुलचे शतक ही टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली राहुल वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडियासाठी डावाची सुरुवात करेल. या मालिकेपूर्वी इंडिया अ विरुद्ध त्याचे शतक हे वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांसाठी एक मजबूत संदेश आहे. ऑस्ट्रेलिया अ संघाने पहिल्या डावात ४२० धावा केल्या. भारताकडून मानव सुथारने पाच, तर गुरनूर ब्रारने तीन विकेट्स घेतल्या. त्यानंतर पहिल्या डावात भारताचा डाव १९४ धावांवर संपला.
भारताचा स्टार केएल राहुलने शतक ठोकले आहे, त्याने कमालीची कामगिरी करत वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना चेलेंज केलं आहे. साई सुदर्शन वगळता इतर कोणत्याही खेळाडूने विशेष कामगिरी केली नाही. हेन्री थॉर्नटनने चार आणि टॉड मर्फीने दोन विकेट्स घेतल्या. राहुलने पहिल्या डावात फक्त ११ धावा केल्या, पण आता त्याने दुसऱ्या डावात शतक झळकावून टीम इंडियाला अडचणीतून वाचवले आहे. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, ऑस्ट्रेलिया अ संघाने भारतीय संघासमोर ४१२ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
HUNDRED FOR KL RAHUL 💯 – Rahul smashed a terrific Hundred against Australia A while chasing 412 runs in the 2nd unofficial Test ⚡ A Special knock, KL Rahul 2.0 is roaring. pic.twitter.com/B7wJzsZYZI — Johns. (@CricCrazyJohns) September 26, 2025
या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने चौथ्या दिवशी दुपारच्या जेवणापर्यंत ३ गडी गमावून २६१ धावा केल्या. सध्या चौथ्या दिवसाचे पहिले सत्र सुरू आहे. संघाला विजयासाठी अजूनही १५१ धावा करायच्या आहेत. केएल राहुल १०७ धावांवर नाबाद आहे, तर साई सदूरशन ९८ धावांवर नाबाद आहे. विजय सुनिश्चित करण्याची जबाबदारी दोन्ही खेळाडूंवर आहे. केएल राहुल हा टीम इंडियाचा स्टार फलंदाज आहे. त्याने ६३ कसोटी सामन्यांमध्ये १११ डावांमध्ये ३५.४१ च्या सरासरीने ३७८९ धावा केल्या आहेत.
या फॉरमॅटमध्ये त्याने १० शतके आणि १९ अर्धशतके ठोकली आहेत. गेल्या इंग्लंड दौऱ्यातही राहुलने असाधारण कामगिरी केली होती. त्याने पाच सामन्यांमध्ये १० डावांमध्ये ५३.२० च्या सरासरीने ५३२ धावा केल्या होत्या, ज्यात दोन शतकांचा समावेश होता. आता, राहुल २ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत आपले कौशल्य दाखविण्याचा प्रयत्न करेल.