फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचवा कसोटी सामना : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना सिडनी येथे खेळवला जाणार आहे. सध्या या मालिकेचा कल ऑस्ट्रेलियाच्या संघाकडे आहे. तीन सामान्यापर्यत मालिका १-१ अशी बरोबरीत होती त्यानंतर चौथ्या सामन्यांमध्ये विजय मिळवून ऑस्ट्रेलियाच्या संघाने टीम इंडियाला १-२ असे पिछाडीवर टाकले आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या खेळावर अजूनही सस्पेंस कायम आहे.
भारताचा मुख्य कोच गौतम गंभीर यांची आज म्हणजेच २ जानेवारी रोजी पत्रकार परिषदे पार पडली. प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही रोहितच्या खेळाबाबत पत्रकार परिषदेत कोणतेही उत्तर दिले नाही. आता, टीम इंडियाच्या सराव सत्राचे व्हिडिओ आणि काही चित्रे समोर आली आहेत, ज्यामध्ये रोहित शर्मा सिडनी कसोटीत न खेळण्याचा एक मोठा इशारा दिसत आहे.
सिडनीत होणाऱ्या पाचव्या कसोटीसाठी टीम इंडिया जोरदार सराव करत आहे. आज टीम इंडियाच्या सराव सत्राचे व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. या काळात भारतीय खेळाडू स्लिप कॅचिंग करतानाचे चित्र सर्वाधिक चर्चेचा विषय ठरले आहे. वास्तविक, विराट कोहली, नितीश रेड्डी, केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल स्लिपमध्ये झेल घेण्याचा सराव करताना दिसले. या काळात रोहित शर्मा दिसला नाही, तर रोहित सामन्यादरम्यान स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसला. याशिवाय आणखी एका व्हिडिओमध्ये शुभमन गिल प्रशिक्षक गौतम गंभीर आणि जसप्रीत बुमराह यांना भेटताना दिसला. आता रोहित शर्मा सिडनी कसोटी खेळणार नसल्याचा अंदाज चाहत्यांनी बांधला असला तरी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही.
Rohit Sharma not part of the potentially new-look slip cordon. With Kohli at first, KL at second and Reddy at third. While Shubman Gill was taking catches at slip for a spinner. The massive intrigue of Indian cricket #AusvInd pic.twitter.com/aynUip01Om
— Bharat Sundaresan (@beastieboy07) January 2, 2025
मेलबर्न कसोटीत टीम इंडियाला १८४ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. नियमानुसार अनिर्णित राहिलेल्या सामन्यात टीम इंडियाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर रोहित शर्मावरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रोहित बऱ्याच दिवसांपासून फलंदाजीत फ्लॉप ठरत आहे. या मालिकेबद्दल बोलायचे झाल्यास, रोहितने आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने केवळ ३१ धावा केल्या आहेत. मेलबर्न कसोटीपासून रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत अटकळ बांधली जात आहे.
भारताच्या संघाला पाचवा कसोटी सामना जिंकणे अनिवार्य आहे शेवटच्या सामन्यांमध्ये विजय मिळवल्यास भारताच्या संघाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्वाचा आहे.