फोटो सौजन्य - सोशल मीडिया
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड : कुसल परेराचे शतक आणि श्रीलंकेच्या विजयाने २०२५ वर्षाची सुरुवात झाली. या वर्षातील पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना नेल्सन येथील सॅक्सटन ओव्हल येथे न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कुसल परेराच्या शतकाच्या जोरावर पाहुण्या संघ श्रीलंकेने ७ धावांनी विजय मिळवला. मात्र, यजमानांनी तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने न्यूझीलंडसमोर २१९ धावांचे लक्ष्य ठेवले होते, या धावसंख्येसमोर किवी संघ निर्धारित २० षटकात ७ गडी गमावून २११ धावाच करू शकला.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली. पॉवरप्लेमध्ये संघाने ४९ धावा केल्या पण दोन विकेटही गमावल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कुसल परेराने ४६ चेंडूत १३ चौकार आणि ४ गगनचुंबी षटकारांच्या मदतीने १०१ धावांची खेळी करत संघाला २१८ धावांपर्यंत नेले. त्याच्याशिवाय कर्णधार चारिथ असलंकाने २४ चेंडूत ४६ धावांची तुफानी खेळी केली. कुसल परेरा महेला जयवर्धने आणि तिलकरत्ने दिलशान यांच्यानंतर श्रीलंकेसाठी T२० मध्ये शतक झळकावणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. १४ वर्षांनंतर श्रीलंकेच्या खेळाडूने T20 मध्ये शतक झळकावले आहे.
१०० – महेला जयवर्धने, २०१०
१०४*- तिलकरत्ने दिलशान, २०११
१०१ – कुसल परेरा, २०२५
Runs: 101
Balls: 46
4s/6s: 13/4
SR: 219.57Kusal Perera slams his first T20I 💯, against New Zealand 🔥🔥🔥 #NZvsSL pic.twitter.com/JbRUwgZArA
— Cricbuzz (@cricbuzz) January 2, 2025
झीलंडच्या या धावसंख्येचा पाठलाग करताना सलामीवीर रचिन रवींद्रने ३९ चेंडूंत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६९ धावा केल्या आणि सहकारी फलंदाज टिम रॉबिन्सन (३७) सोबत पहिल्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली, परंतु असे असतानाही संघाला पराभवाचा सामना करावा लागला. डॅरेल मिशेल मधल्या फळीत आला आणि त्याने १७ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ३५ धावा केल्या, पण तो शेवटपर्यंत टिकू शकला नाही. श्रीलंकेकडून चारिथ असलंकाने सर्वाधिक ३ बळी घेतले. कुसल परेराला त्याच्या झंझावाती शतकासाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
IND vs AUS : सिडनी कसोटीवर काळे ढग! WTC फायनलच्या आशा भंग होणार? जाणून घ्या हवामानाचा अहवाल
कुशल परेरा आता T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेसाठी सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज बनला आहे. यासह त्याने श्रीलंकेचा माजी फलंदाज तिलकरत्ने दिलशानचा विक्रम मोडीत काढला आहे. २०११ मध्ये, दिलशानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेसाठी सर्वात जलद शतक झळकावले. या सामन्यात दिलशानने ५५ चेंडूत शतक झळकावले होते.