भारतीय क्रिकेट संघ (फोटो- बीसीसीआय/ट्विटर)
भारत आणि बांग्लादेश यांच्यात सध्या कसोटी मालिका सुरू आहे. पहिला सामना भारताने मोठ्या दिमाखात जिंकला आहे. तसेच दूसरा सामना देखील सुरू झाला आहे. मात्र या सामन्यात पावसाचा व्यत्यय येत आहे. आजदेखील पावसामुळे दुसऱ्या कसोटीमधील तिसऱ्या दिवशीचा खेळ थांबवण्यात आला होता. मात्र आता अखेर आजच्या संपूर्ण दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला आहे. दरम्यान या सामन्यात फलंदाजांच्या ऐवजी पावसाने आपली जोरदार बॅटिंग कायम राखली आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेट फायनल खेळण्याचे भारताचे गणित बिघडण्याची शक्यता आहे.
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दूसरा कसोटी सामना हा कानपुरमध्ये सुरू आहे. दरम्यान या सामन्यावर पावसाचे संकट कायम आहे. या सामन्यात फक्त एकाच दिवसाचा खेळ झाला आहे. बाकीचे दोन दिवस तर केवळ पावसानेच बॅटिंग केली आहे. दरम्यान कानपुरमध्ये पावसाचा अंदाज असताना देखील बीसीसीआयने या ठिकाणी सामना आयोजित करण्यामागचे कारण काय? अशी चर्चा आता चाहत्यांमध्ये पहायला मिळत आहे. जर का हा सामना रद्द झाला तर वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप फायनल खेळण्यासाठी भारताचे गणित बिघडू शकते.
UPDATE 🚨
Play for Day 3 in Kanpur has been called off due to wet outfield.#TeamIndia | #INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/HPPxBMhY87
— BCCI (@BCCI) September 29, 2024
भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी आतापर्यंत संघाने १० कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी भारत ७ सामने जिंकला आहे. भारताची टक्केवारी ही ७१.६७ टक्के इतकी आहे. बांग्लादेशनंतर भारत मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारत परदेशात जाऊन ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. आगामी काळात दोन बलाढ्य संघांशी भारताला दोन हात करावे लागणार आहे. त्यामुळे भरताच मार्ग खडतर आहे. त्यामुळे जर का बांग्लादेशविरुद्ध दूसरा सामना खेळला गेला तर, भारताला त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
कानपूरमधील कसोटी सामना जिंकल्यास भारताचे १२ गूण होतील. मात्र सामना रद्द झाल्यास भारताला केवळ ४ च गूण मिळतील. मात्र यानंतर देखील भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळण्यास पात्र असणार आहे. बाकीचे संघ देखील सर्व सामने जिंकत आलेतर मात्र या पॉईंट्स टेबलमध्ये काहीसा बदल पाहायला मिळू शकतो.आयसीसीच्या माहितीनुसार, भारताला ९ पैकी ६ कसोटी सामने जिंकावे लागणार आहेत. यामध्ये बांगलादेशविरुद्ध १ आणि न्यूझीलंडविरुद्ध ३ कसोटी सामने भारत मायदेशात खेळणार आहे. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धचे ५ कसोटी सामने परदेशात खेळावे लागणार आहेत. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये जाण्यासाठी भारतात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या दोन क्रमांकांवर असणे आवश्यक आहे.