Huawei ने उडवली सर्वांची झोप... 100W चार्जिंग सपोर्टसह लाँच केला तगडा स्मार्टफोन, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका
फ्लॅगशिप स्मार्टफोनसह, Huawei ने वॉच जीटी रनर 2, वॉच अल्टिमेट 2, मेटपॅड मिनी, फ्रीबड्स प्रो 5 आणि बँड 11 सिरीज देखील सादर केले आहेत. कंपनीने आतापर्यंत मेट 80 प्रो ग्लोबलची घोषणा केली नाही. स्मार्टफोन काही निवडक मार्केटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे आणि उपलब्धता प्रदेशानुसार बदलू शकते. हा स्मार्टफोन 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Huawei Mate 80 Pro स्मार्टफोन ब्लॅक, ग्रीन आणि गोल्ड शेड्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)
Huawei Mate 80 Pro मध्ये 6.75-इंच LTPO OLED डिस्प्ले आहे, ज्याचे रेजोल्यूशन 2832 × 1280 पिक्सेल आहे आणि पिक्सेल डेंसिटी 460ppi आहे. हे डिव्हाईस 120Hz पर्यंत अडॅप्टिव रिफ्रेश रेट, 1440Hz PWM डिमिंग, 1.07 बिलियनपर्यंत कलर्स आणि 3000 निट्स पीक ब्राइटनेस सपोर्टसह उपलब्ध आहे. Huawei ने ग्लोबल मॉडेलमध्ये कोणते चिपसेट दिले आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही. चीनी व्हेरिअंटमध्ये Kirin 9030 Pro प्रोसेसर आहे. फोन 16GB रॅम आणि 512GB ऑनबोर्ड स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. हे ग्लोबली EMUI 15.0 वर आधारित आहे. चीनमध्ये हे डिव्हाईस HarmonyOS 6.0 सह उपलब्ध आहे.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, Huawei Mate 80 Pro मध्ये 50-मेगापिक्सेलचा मुख्य सेंसर आहे, ज्याचा अपर्चर f/1.4 ते f/4.0 पर्यंत आहे आणि ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन आहे. या डिव्हाईसमध्ये 40-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड शूटर आणि 48-मेगापिक्सेलचा मॅक्रो टेलीफोटो लेंस देखील आहे, ज्यामध्ये 4x ऑप्टिकल झूम आणि 100x पर्यंत डिजिटल झूम आहे. हँडसेटमध्ये ऑटोफोकससह 13-मेगापिक्सेलचा वाइड-अँगल सेल्फी कॅमेरा देखील आहे. फ्रंट आणि रिअर दोन्ही कॅमेरे 4K व्हिडीओ रिकॉर्डिंगला सपोर्ट करतात.
Huawei Mate 80 Pro मध्ये 5,750mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 100W वायर्ड आणि 80W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. हँडसेट मार्केटच्या हिशोबाने सिंगल आणि डुअल-सिम व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, डिव्हाईस डस्ट आणि वाटर रेजिस्टेंससाठी IP68 आणि IP69 रेटिंगसह येते. कनेक्टिविटी ऑप्शनमध्ये वायफाय 7, ब्लूटूथ 6.0, यूएसबी टाइप-C सह यूएसबी 3.1 Gen 1 स्पीड, NFC, डुअल-बँड जीपीएस आणि NavIC सपोर्ट समाविष्ट आहे.






