फोटो सौजन्य - ICC सोशल मीडिया
भारत विरुद्ध बांग्लादेश – चॅम्पियन ट्रॉफी : भारताचा संघ आज म्हणजेच २० फेब्रुवारी रोजी चॅम्पियन ट्रॉफीचा पहिला सामना बांग्लादेशविरुद्ध खेळणार आहे. टीम इंडिया विजयाच्या उद्देशाने त्याचबरोबर स्पर्धेची सुरुवात जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. भारताचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचे सर्व सामने खेळणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले आहेत. यामध्ये पहिल्या गटामध्ये भारत, बांग्लादेश न्यूझीलंड यांनी पाकिस्तान हे संघ आहेत. तर दुसऱ्या गटामध्ये म्हणजेच ब गटामध्ये दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत.
भारत आणि बांग्लादेश हे दोन्ही संघ अ गटातून आहेत आणि दोघेही सामना जिंकून आपल्या मोहिमेची सुरुवात करण्यास उत्सुक आहेत. भारतीय संघाने शेवटचे २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले होते. अलिकडेच इंग्लंडला एकदिवसीय मालिकेत ३-० ने हरवल्यानंतर, टीम इंडियाचे मनोबल उंचावले आहे, तर बांगलादेश संघही भारताला हरवण्यासाठी सज्ज आहे. अशा परिस्थितीत, आजच्या सामन्यापूर्वी, आम्ही तुम्हाला दुबईच्या खेळपट्टीबद्दल सांगणार आहोत.
भारतीय संघ आणि बांगलादेश यांच्यात होणारा चॅम्पियन्स ट्रॉफीचा दुसरा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सहसा दुबईची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना खूप मदत करते, परंतु यावेळी फ्रेंच खेळपट्टीमुळे येथे बॅट आणि बॉलमध्ये योग्य संतुलन अपेक्षित आहे. आज दुबईमध्ये आकाश ढगाळ असेल, त्यामुळे वेगवान गोलंदाजांनाही मदत मिळताना दिसेल. येथे दव महत्त्वाची भूमिका बजावेल, त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य देईल. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या एकदिवसीय सामन्यांच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया.
Bangladesh and India start their #ChampionsTrophy campaign today 🏏
How to watch the big clash ➡️ https://t.co/S0poKnxpTX pic.twitter.com/5jICaL7F5d
— ICC (@ICC) February 20, 2025
आतापर्यत दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ५८ सामने खेळले आहेत. यामध्ये फक्त १ सामना अनिर्णयीत राहिला आहे. पहिला फलंदाजी करणाऱ्या संघामध्ये आतापर्यत २२ सामने जिंकले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघामध्ये ३४ सामने जिंकले आहेत. या मैदानावर आतापर्यत सर्वाधिक धावसंख्या २०१५ मध्ये झालेल्या इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान या सामन्यांमध्ये ३५५ धावा केल्या होत्या. सर्वात कमी धावसंख्या नामिबिया विरुद्ध युएई – २०२३ यामध्ये ९१ सर्वबाद होती.
सर्वाधिक यशस्वी पाठलाग – २८७/८ (४९.४ षटकांत – श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान – २०१३)
सर्वात कमी एकूण बचाव – १६८ सर्वबाद (यूएई विरुद्ध नेपाळ – २०२२)
पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या – २१९
एकूण शतके- ३४
एकूण पन्नास- १८१
एकूण चौकार- २९२०
एकूण षटकार – ४९४
भारत विरुद्ध बांग्लादेश सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० मिनिटांनी सुरु होणार आहे, तर २ वाजता सामन्याचे नाणेफेक होईल.