फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंगचे संपूर्ण माहिती : भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये पहिला सामना आज म्हणजेच २० फेब्रुवारी रोजी युएईमधील दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट चाहते प्रचंड उत्सुक आहेत. भारताचे फलंदाज इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये दमदार फॉर्ममध्ये दिसले. त्याचबरोबर तीन इंडियाच्या गोलंदाजानी देखील मालिकेमध्ये कमालीची कामगिरी करून दाखवली आहे. या स्पर्धेमध्ये भारताचा संघाचा महत्वाचा आणि वर्ल्ड नंबर १ वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे स्पर्धेच्या बाहेर आहे, तर बुमराहच्या जागेवर हर्षित राणाला संघामध्ये स्थान मिळाले आहे.
Champions Trophy 2025 चे उपकर्णधार शुभमन गिलला का दिले? स्वतः कॅप्टन रोहित शर्माने सांगितले स्पष्ट
रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे तर शुभमन गिल उपकर्णधार असणार आहे. भारताचा संघ चॅम्पियन ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यांमध्ये कोणत्या खेळाडूंना प्लेइंग ११ मध्ये संधी देणार हे पाहणं मनोरंजक असेल. पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये झालेल्या पहिल्या चॅम्पियन ट्रॉफीच्या सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या संघाला घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला आहे.
चॅम्पियन ट्रॉफीचा दुसरा सामना भारत आणि बांगलादेश या दोन संघामध्ये खेळवला जाणार आहे, हा सामना २० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. या दुसऱ्या सामन्याचे आयोजन दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर करण्यात आले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा दुसरा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २:३० वाजता सुरु होणार आहे. या सामान्यांच्या अर्ध्या तासाआधी म्हणजेच २ वाजता नाणेफेक होईल.
The #MenInBlue are back in action 🎬.
12th Man Army, drop a 💙 to wish #TeamIndia the very best for #ChampionsTrophy! 🙌🏻#PlayBold #ನಮ್ಮRCB #INDvBAN #CT2025 pic.twitter.com/iPBlrt1dPs
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) February 20, 2025
भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामधील सामना भारतीय प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर पाहू शकणार आहेत. हे हिंदी आणि इंग्रजीसह विविध भारतीय भाषांमध्ये प्रसारित केले जात आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या दुसऱ्या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही JioHotstar अॅपवर पाहू शकता. दुपारी १.३० मिनिटानी तुम्हाला या वेबसाईट आणि चॅनेलवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे. त्याचबरोबर तुम्ही या सामन्याचे लाईव्ह अपडेट नवराष्ट्र डिजिटलवर पाहू शकता.
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, शुभमन गिल (उपकर्णधार), लोकेश राहुल (विकेटकिपर), ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.