फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध बांग्लादेश : भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये सध्या T20 मालिका सुरु आहे, टीम इंडिया बांग्लादेश विरुद्ध ३ T20 सामान्यांची मालिका खेळणार आहे. ६ ऑक्टोबर रोजी भारताचा मालिकेचा पहिला सामना बांग्लादेशविरुद्ध झाला. या सामन्यात भारताच्या संघाने सहज विजय मिळवून मालिकेमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या संघाने पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी कमाल करून बांग्लादेशला १२७ धावांवर रोखले. त्यानंतर भारताच्या संघाने १२ षटकामध्ये लक्ष्य पूर्ण केले. आता ९ ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये दुसरा सामना रंगणार आहे.
आता दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. दुसरा सामना मंगळवारी होणार आहे ज्यासाठी टीम इंडिया येथे पोहोचली आहे. राजधानीत पोहोचल्यावर टीम इंडियाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आणि कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नावाने घोषणाबाजी करण्यात आली. T20 विश्वचषक-2024 मध्ये विजेतेपद पटकावल्यानंतर रोहित शर्माने या फॉरमॅटला अलविदा केला होता. यानंतर सूर्यकुमार यादवची भारताच्या T20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर सूर्यकुमारची ही दुसरी मालिका आहे.
Gwalior ✈️ Delhi#TeamIndia have arrived for the 2nd #INDvBAN T20I 👌👌@IDFCFIRSTBank pic.twitter.com/jBWuxzD0Qe
— BCCI (@BCCI) October 8, 2024
ग्वाल्हेरहून परतताना टीम इंडिया दिल्लीत पोहोचताच सर्व खेळाडूंचे जंगी स्वागत करण्यात आले. संघाच्या स्वागतासाठी ढोल वाजवण्यात आले. टीम इंडियाचे खेळाडू एकामागून एक बसमधून उतरत असताना हे ढोलकी वाजवणारे त्यांची नावे घेत होते. पण सूर्यकुमार येताच सर्वांनी ‘टीम इंडियाची शान सूर्यकुमार’ अशा घोषणा दिल्या. या लोकांसोबत सूर्यकुमार ढोलावर जोमाने नाचले.
भारतीय संघामध्ये पहिल्या सामन्यात दोन खेळाडूंनी पदार्पण केले आहे, यामध्ये मयंक अग्रवाल आणि नितीश कुमार रेड्डी या दोघांनी भारतीय क्रिकेट संघामध्ये पदार्पण केले आहे. दोघांनीही पहिल्या सामन्यात कमालीची कामगिरी केली.