मोहम्मद सिराज आणि बेन डकेट(फोटो-सोशल मिडिया)
IND Vs END : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचा तिसरा सामना लॉर्ड्स येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व दिसून येत आहे. तिसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावात इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटला बाद झाला. डकेटला बाद केल्यानंतर मोहम्मद सिराज खूप आक्रमक दिसून आला आणि त्याने डकेटला खांद्यावर धक्का दिल्याचे दिसून आला.
सिराजने केलेल्या या कृत्यावर पंच देखील नाराज झाल्याचे दिसून आले. पंचाकडून यावेळी सिराजला फटकरण्यात आले. त्यांनतर प्रकरण शांत करण्यासाठी, भारतीय संघाच्या काही खेळाडूंनी सिराजला डकेटपासून लांब नेले, नंतर सिराजने आपला आनंद साजरा केला. या सर्वप्रकाराचा आता एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
हेही वाचा : Photo : केएल राहुलचा जलवा कायम! भारताच्या सलामीवीरापुढे इंग्लंडचे ‘हे’ फलंदाज किस झाड कि पत्ती?
इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील सहावे षटक सिराज गोलंदाजी करण्यास आला. त्याच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर, बेन डकेटने मिड-ऑनवर शॉट मारण्याचा प्रयत्न केला, परंतु बेन डंकेल कंट्रोलमध्ये दिसला नाही. त्यामुळे चेंडू बॅटला व्यवस्थित लागला नाही आणि तो मिड-ऑनच्या हातात जाऊन विसावला. इंग्लंडची सुरवात चांगली झाली नाही. त्यांना पहिला धक्का बेन डकेटच्या रूपात लागला. १२ धावा करून डकेटला सिराजच्या बाद केले. डकेट बाद झाल्यानंतरची ही प्रतिक्रिया तिसऱ्या दिवसाशीही संबंधित असल्याचे बोलले जात आहे.
Siraj sending off duckett😭😭
pic.twitter.com/DbxLwloN9Z— ` (@slayerkolly) July 13, 2025
तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस, जेव्हा भारतीय संघ इंग्लड संघाला एकापेक्षा जास्त षटके टाकण्याचा प्रयत्न करणार होता, तेव्हा इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीर जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी वेळ वाया घालवला. ज्यामुळे एकापेक्षा जास्त षटके खेळण्याची गरज भासणार नाही. शुभमन गिलने क्रॉलीकडे बोट दाखवले आणि डकेटशी रागाने वाद घातला होता. यादरम्यान सिराज हा आपल्या कर्णधाराच्या बचावासाठी समोर गेला होता. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर, सिराज सलामीवीरांकडे पाहत होता आणि काहीतरी बोलला.
हेही वाचा : IND vs ENG : टीम इंडियाचा ऐतिहासिक भीम पराक्रम; ५० वर्षांच्या विक्रमाला दिली मूठमाती
मोहम्मद सिराजच्या या कृत्यानंतर, आयसीसी त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे. जर मॅच रेफरी रिची रिचर्डसनला हे जाणूनबुजून खांद्यावर मारले गेले आहे असे आढळून आले तर ते आयसीसी नियम २.१२ अंतर्गत लेव्हल १ किंवा २ चा आरोप लावू शकते. क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचा चुकीचा शारीरिक संपर्क प्रतिबंधित आहे. जर एखादा खेळाडू मुद्दाम, बेपर्वाईने किंवा लक्ष न देता दुसऱ्या खेळाडू किंवा पंचाशी टक्कर देतो, खांद्यावर आदळतो किंवा धावतो, तर ते नियमाचे उल्लंघन मानण्यात येते.