भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये या सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्स मैदानावर खेळला जात आहे. काल सामन्याचा तिसरा दिवस पार पडला. इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३८७ धावांच्या प्रत्युउत्तरात भारताने ३८७ धावा केल्या. यावेळी भारताचा फलंदाज केएल राहुलने शानदार शतक झळकावले. त्याचबरोबर त्याने इंग्लंडच्या सलामीच्या फलंदाजांना त्यांच्याच भूमीवर चांगलंच आपट्लं आहे. केएल राहुलच्या कामगीरीबद्दल आपण जाणून घेऊया.(फोटो-सोशल मीडिया)
Photo: KL Rahul's brilliance continues! Which tree or leaf is this England batsman like in front of India's opener?
टीम इंडियाचा स्टार सलामीवीर केएल राहुल इंग्लंड दौऱ्यात आपल्या फलंदाजीने चांगलाच कहर करत आहे. त्याने इंग्लंडमध्ये लॉर्ड्स मैदानावर आपले दुसरे शतक पूर्ण केले आहे. केएल राहुलने लॉर्ड्सवर १७७ चेंडूत 100 धावांची शानदार खेळी केली.
केएल राहुलने मागच्या सात वर्षात इंग्लंडमध्ये ४ थे शतक ठोकले आहे. यापूर्वी त्याने लीड्स कसोटीत देखील शतक ठोकलं होतं. यापूर्वी 2021 मध्ये देखील राहुलने लॉर्ड्सवर शतकी खेळी केली होती. याआधी त्याने 2018 मध्ये ओव्हलवर शतकी पारी खेळली होती. त्यानंतर आता त्याने शतक लगावले आहे.
भारतीय सलामीवीर केएल राहुलने लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी आपला जलवा दाखवला. त्याने तिसऱ्या कसोटी सामन्यात आपले दहावे शतक पूर्ण केले. यासह केएल राहुलने लॉर्ड्सवर दुसरं शतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.
इंग्लंडकडून 2018 नंतर इंग्लंडचा बेन डकेट याने 3 शतक झळकावली आहेत. तर जॅक क्राउली आणि रॉरी बर्न्स यांनी प्रत्येकी 2 शतकं ठोकली आहेत. केएल राहुल मात्र यांच्या तुलनेत खूप पुढे आहे.
केएल राहुलने मागच्या 7 वर्षात इंग्लंडच्या भूमीवर इंग्लंडच्या सलामीवीरापेक्षा अधिक शतकं ठोकली आहेत. यात सध्याचे ओपनर बेन डकेट आणि जॅक क्राउलीस माजी ओपनर रॉरी बर्न्स यांचा देखील समावेश आहे.