टिम इंडिया(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत टीम इंडियाचा युवा संघ इंग्लंडमध्ये शानदार कामगिरी करताना दिसत आहे. या दरम्यान शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत आणि आकाश दीप सारखे युवा खेळाडू त्यांच्या शानदार कामगिरी करत असून ते सर्वांना आनंद देत आहेत. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दोन सामने खेळले गेले आहेत, तर तिसरा सामना लॉर्ड्सच्या मैदानात खेळला जात आहे.
हेही वाचा : MLC Final 2025 Live Streaming : पूरन आणि मॅक्सवेलच्या संघात ट्राॅफीसाठी टक्कर, मोफत पहा MLC फायनल
भारतीय संघाने आतापर्यंत फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाडीवर चांगली कामगिरी केली आहे. इंग्लंडच्या भूमीवर भारतीय फलंदाज शतके झळकावत असून गोलंदाज देखील विकेट घेण्यात यशस्वी होताना दिसत आहेत. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडच्या ३८७ च्या प्रत्युउत्तरात टीम इंडियाने एकूण ३८७ धावा केल्या. यासह शुभमन गिल सेनेने कसोटी क्रिकेटचा ५० वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. यापूर्वी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या नावावर जमा होता.
भारतीय संघाने आतापर्यंत इंग्लंडमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. यामध्ये केएल राहुल, कर्णधार शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंत यांनी फलंदाजीत सर्वाधिक लक्ष्य वेधून घेतलं आहे. दरम्यान, लॉर्ड्सच्या मैदानावर पहिल्या डावात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा ५० वर्षांचा जुना विक्रम मोडला आहे.
आता टीम इंडियाने कसोटी क्रिकेट मालिकेत परदेशी भूमीवर सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम केला आहे. भारताने इंग्लंडच्या या मालिकेत ३६ षटकार लगावले आहेत. दुसरीकडे, यापूर्वी १९७४ मध्ये वेस्ट इंडिजच्या संघाने भारताविरुद्ध कसोटी मालिकेत एकूण ३२ षटकार ठोकले होते. आता वेस्ट इंडिजचा हा विक्रम शुभमन गिलने सेनेने हा विक्रम मोडला आहे.