Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मालिका आणि अब्रू दोन्ही पणाला! श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाला लागला पराभवाचा शाप? ‘या’ लाजिरवाण्या आकड्यांनी वाढवली चिंता

IND vs Eng 4th t20 Shreyas iyer unwanted captaincy record: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. सलग पाच सामन्यांमध्ये पराभव पत्करल्यानंतर अय्यरच्या नावार लाजिरवाण्या विक्रमांची नोंद झाली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 09, 2026 | 02:21 PM
मालिका आणि अब्रू दोन्ही पणाला! श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाला लागला पराभवाचा शाप? ‘या’ लाजिरवाण्या आकड्यांनी वाढवली चिंता
Follow Us
Follow Us:
  • श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाला लागला पराभवाचा शाप?
  • अय्यरचा भारतासाठी खेळणार १५० वा सामना
  • तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा सर्वात मोठा पराभव
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना आज, ९ जुलै रोजी ब्रिस्टल येथे खेळला जाईल. इंग्लंडविरुद्ध ०-२ ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाला मालिकेत टिकून राहण्यासाठी हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. आजच्या या सामन्यात सर्वांचे लक्ष श्रेयस अय्यरवर असेल. आजच्या टी-२० सामन्यात केवळ मालिकाच नव्हे, तर आपली प्रतिष्ठाही वाचवण्याचे आव्हान असेल. कर्णधारपद स्वीकारल्यापासून आपला पहिला विजय नोंदवण्याची अय्यरसाठी ही एक मोठी संधी असणार आहे. कर्णधार म्हणून अय्यरला सातत्याने आव्हानांचा सामना करावा लागला आहे.

IND vs ENG : तिलक वर्मा OUT, संजू सॅमसन IN? मालिका वाचवण्यासाठी टीम इंडियाची अग्निपरीक्षा; पाहा पिच रिपोर्ट आणि संभाव्य Playing XI

श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाला लागला पराभवाचा शाप?

कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरने आपल्या शेवटच्या ११ सामन्यांपैकी १० सामने गमावले आहेत. अय्यरने आतापर्यंत चार सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले असून, या चारही सामन्यात सलग पराभव पत्कारावा लागला आहे. याआधी आयर्लंडविरुद्ध दोन सामने गमावले आणि आता इंग्लंडविरुद्धही सलग दोन सामने गमावले आहेत.

अलिकडच्या सामन्यांमधील भारतीय संघाच्या खराब कामगिरीमुळे भारतीय कर्णधार आणि व्यवस्थापनाला टीकेला सामोरे जावे लागले आहे. अय्यरच्या कर्णधारपदाखाली आयर्लंडमध्ये ०-२ ने मालिका गमावल्यानंतर, श्रेयस अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर देखील जोरदार टीका झाली.

आयपीएल २०२६ मध्ये अय्यरच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह

आयपीएल २०२६ मध्ये कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरची कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. त्याने पंजाब किंग्ससाठी हंगामाची सुरुवात धमाकेदार केली, पण शेवटच्या सात सामन्यांपैकी सहा सामने गमावले. आपल्या शेवटच्या सात आयपीएल सामन्यांमध्ये अय्यरची सरासरी ३६.५० राहिली आहे. इतकेच नव्हे तर, भारताच्या पाच सामन्यांमध्ये त्याची सरासरी केवळ २४.६ राहिली आहे.

अय्यर भारतासाठी खेळणार १५० वा सामना

श्रेयस अय्यरने भारतासाठी १४९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून तो १५० सामन्यांचा टप्पा ओलांडण्याच्या जवळ आहे. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने एकूण १४ कसोटी, ७९ एकदिवसीय आणि ५६ टी-२० सामने खेळले आहेत.

तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा सर्वात मोठा पराभव

तिसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडकडून १२५ धावांनी झालेल्या दारुण पराभवानंतर, भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने आपल्या संघाची कामगिरी ‘अत्यंत खराब’ असल्याचे म्हटले आणि एवढा मोठा पराभव ‘अस्वीकार्य’ असल्याचे कबूल केले. अय्यरच्या कर्णधारपदाखाली भारताला अद्याप एकही टी-२० आंतरराष्ट्रीय सामना जिंकता आलेला नाही. तिसरा सामना संघासाठी खूप निराशाजनक होता. २०२ धावांचा पाठलाग करताना, संघ अवघ्या ११.४ षटकांत ७६ धावांवर सर्वबाद झाला, जो या फॉरमॅटमधील धावांच्या बाबतीत त्यांचा सर्वात मोठा पराभव आहे.

FIFA World Cup 2026 Quarterfinals Schedule: 40 संघ आउट; ‘या’ 8 संघात रंगणार थरार, पाहा क्वार्टर फायनलचे संपूर्ण वेळापत्रक

Web Title: Ind vs eng 4th t20 shreyas iyer captaincy record team india series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • Gautam Gambhir
  • IND Vs ENG
  • IND vs ENG T-20 Match
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

IND vs WI: वैभव सूर्यवंशी IN, संजू सॅमसन OUT! वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या T20 मध्ये अशी असेल भारताची Playing 11?
1

IND vs WI: वैभव सूर्यवंशी IN, संजू सॅमसन OUT! वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या T20 मध्ये अशी असेल भारताची Playing 11?

Shreyas Iyer चा ‘वन-मॅन शो’ ! शतक ठोकलं अन् ‘किंग’ कोहलीचा विक्रम मोडला; वेस्ट इंडिजविरुद्ध रचला इतिहास
2

Shreyas Iyer चा ‘वन-मॅन शो’ ! शतक ठोकलं अन् ‘किंग’ कोहलीचा विक्रम मोडला; वेस्ट इंडिजविरुद्ध रचला इतिहास

IND VS WI: आग ओकायला Team India चे बॅटसमन तयार; इंडिजविरुद्ध कुठे होणार दुसरा T20 सामना?
3

IND VS WI: आग ओकायला Team India चे बॅटसमन तयार; इंडिजविरुद्ध कुठे होणार दुसरा T20 सामना?

Ajit Agarkar चा कार्यकाळ संपताच गौतम गंभीर भावूक; सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट, म्हणाला…
4

Ajit Agarkar चा कार्यकाळ संपताच गौतम गंभीर भावूक; सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट, म्हणाला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.