टिम इंडिया(फोटो-सोशल मीडिया)
लॉर्ड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात असून या मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्स या ऐतिहासिक मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. तिसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावात लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडच्या संघाने ४ गडी गमावून ९८ धावा केल्या आहेत. इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर माघारी परतले आहेत. भारताकडून मोहम्मद सिराजुने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या आहेत.
भारतीय संघाने आतापर्यंत फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही प्रकारात चांगली कामगिरी केली आहे. इंग्लंडच्या भूमीवर भारतीय फलंदाज शतके झळकावत असून गोलंदाज देखील विकेट घेण्यात पुढे आहेत. लॉर्ड्स येथे खेळवण्यात येत असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडने ३८७ धावा केल्या. यात जो रूटने शतक पूर्ण केले. तर भारताकडून बुमराहने ५ विकेट्स घेतल्या. इंग्लंडच्या ३८७ धावांच्या प्रत्युउत्तरात टीम इंडियाने ३८७ धावा केल्या. यामध्ये केएल राहुलने शानदार शतक झळकावले.
हेही वाचा : IND vs ENG : टीम इंडियाचा ऐतिहासिक भीम पराक्रम; ५० वर्षांच्या विक्रमाला दिली मूठमाती
तिसऱ्या दिवसाच्या शेवटाला इंग्लड संघ केवळ एकच ओव्हर खेळू शकला. इंग्लंडने तिसऱ्या दिवशीच्या अखेरीस बिनबाद २ धावा केल्या होत्या. चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा इंग्लडची सुरवात चांगली झाली नाही. इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट १२ धावांवर बाद झाला. बेन डकेटच्या रूपात इंग्लडला पहिला झटका बसला. त्यांनतर सिराज त्यावरच थांबला नाही तर त्याने ऑली पोपला ४ धावांवर बाद करून भारताला दुसरे यश मिळवून दिले. इंग्लंडच्या ४२ वर २ विकेट गेलेल्या असताना इंग्लंडला झॅक क्रॉलीच्या रूपात तिसरा झटका बसला. त्याला २२ धावांवरनीतिश कुमार रेड्डीने यशस्वीद्वारा झेलबाद केले. क्रॉलीनंतर मैदानात आलेला हॅरी ब्रुक चांगल्या लयीत दिसत असताना त्याला आकाश दीपने २३ धावांवर त्रिफळाचित केले. त्यामुळे इंग्लंडने लाँच ब्रेकपर्यंत ४ गडी गमावून ९८ धावा केल्या होत्या. भारताकडून मोहम्मद सिराजच्या सर्वाधिक २, तर रेड्डी आणि आकाश दीपने प्रत्येकी १ विकेट घेतली आहे.
सलामीवीर बेन डकेटला बाद झाला. डकेटला बाद केल्यानंतर मोहम्मद सिराज खूप आक्रमक दिसून आला आणि त्याने डकेटला खांद्यावर धक्का दिल्याचे दिसून आला. सिराजने केलेल्या या कृत्यावर पंच देखील नाराज झाल्याचे दिसून आले. पंचाकडून यावेळी सिराजला फटकरण्यात आले. त्यांनतर प्रकरण शांत करण्यासाठी, भारतीय संघाच्या काही खेळाडूंनी सिराजला डकेटपासून लांब नेले, नंतर सिराजने आपला आनंद साजरा केला. या सर्वप्रकाराचा आता एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
हेही वाचा : Photo : केएल राहुलचा जलवा कायम! भारताच्या सलामीवीरापुढे इंग्लंडचे ‘हे’ फलंदाज किस झाड कि पत्ती?