IND vs ENG: लीड्स कसोटी: इंग्लंडचा दमदार विजय, अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीत १-० अशी आघाडी
IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यात लीड्समध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने ५ विकेट्सने विजय मिळवत अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. या विजयासह इंग्लंडने एक विक्रमही आपल्या नावावर केला. इंग्लंडचा संघ भारताविरुद्ध दोनदा ३५० पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करणारा पहिला संघ बनला आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी सामन्यात सर्वाधिक धावांचा (१६५५) हा विक्रम आहे.
इग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात ४७१ धावा केल्या. या काळात भारताकडून तीन खेळाडूंनी शतके केली. यशस्वी जैस्वालने 101, शुभमन गिलने 147 आणि ऋषभ पंतने 134 धावा केल्या. त्याच्याशिवाय केएल राहुलने ४२ आणि रवींद्र जडेजाने ११ धावा केल्या. इंग्लंडकडून जोश टोंगने ४, स्टोक्सने ४, ब्रायडन कार्सेने १ आणि शोएब बशीरने १ विकेट घेतली.इंग्लंडकडून गोलंदाजीत जोश टोंग आणि बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या, तर ब्रायडन कार्से व शोएब बशीर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
IND Vs ENG: पाऊस कोणाच्या विजयावर करणार अभिषेक? भारत-इंग्लंडचा सामना पोहोचला रोमांचक स्थितीत
पहिल्या डावात सर्व विकेट गमावल्यानंतर इंग्लंडने ४६५ धावा केल्या. पहिल्या डावाच्या आधारे भारताला ६ धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडकडून ऑली पोपने शतक झळकावले. ऑली पोपने १०६, हॅरी ब्रुकने ९९, बेन डकेटने ६२, जेमी स्मिथने ४०, ख्रिस वोक्सने ३८ आणि जो रूटने २८ धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने ५, प्रसिद्ध कृष्णाने ३ आणि सिराजने २ बळी घेतले.
भारताने दुसऱ्या डावात ३६४ धावा केल्या. यादरम्यान, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनी शतकी खेळी केली. केएल राहुलने १३७ आणि पंतने ११८ धावा केल्या. पंतने दोन्ही डावात शतके झळकावली. त्याच्याशिवाय साई सुदर्शनने ३०, करुण नायरने २० आणि रवींद्र जडेजाने २५ धावा केल्या. इंग्लंडकडून ब्रायडन कार्सेने ३, जोश टोंगने ३, शोएब बशीरने २, ख्रिस वोक्सने १ आणि स्टोक्सने १ विकेट घेतली.
IND vs ENG : WTC मध्ये Ben Duckett ने रचला इतिहास; ‘असे’ करणारा बनला इंग्लंडचा पहिला सलामीवीर..
३७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाने ५ विकेट्स गमावून सामना जिंकला. या विजयासह इंग्लंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. बेन डकेटने १४९ धावा करून सामना इंग्लंडच्या बाजूने वळवला. तर जॅक क्रॉलीने ६५ आणि बेन स्टोक्सने ३३ धावा केल्या. जो रूटनेही एका बाजूने ५० धावा केली. रूटने नाबाद ५३ आणि जेमी स्मिथने नाबाद ४४ धावा केल्या. भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने 2, शार्दुल ठाकूरने 2 आणि जडेजाने 1 बळी घेतला.