इंग्लंड विरुद्ध भारत सामना (फोटो- icc )
India Vs England: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना लीड्स येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंड विजयाच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. भारतीय संघाने इंग्लंडला जिंकण्यासाठी ३७१ धावांचे लक्ष्य दिले आहे. पहिली कसोटी जिंकण्यासाठी इंग्लंडला आता 107 धावा कराव्या लागणार आहेत. मात्र या सामन्यात पाऊस सातत्याने व्यत्यय आणत आहेत.
सध्या भारत आणि इंग्लंड सामन्यात ही मॅच इंग्लंडकडे झुकल्याचे चित्र दिसून येत आहे. या सामन्याचा आजकहा शेवटचा दिवस आहे. प्रसिद्ध कृष्णाने 2 तर ठाकूरने 2 विकेट्स घेतल्या आहेत. सध्या पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे सामना थांबला आहे. भारताने नियोजनबद्ध गोलंदाजी केल्यास विजयाची संधी निर्माण होऊ शकते. नियोजनबद्ध गोलंदाजी आणि पाऊस या दोनच गोष्टी भारताला पराभवापासून वाचवू शकतो. नाहीतर हा सामना पूर्णपणे इंग्लंडच्या झोळीत गेल्याचे पाहायला मिळत आहे.
England need 102 runs to win. India require six wickets.
A mouth-watering final session of the first #ENGvIND Test awaits with the game hanging in the balance ⚖️
More ➡️ https://t.co/62moN1jfz9 pic.twitter.com/C23yBgA5xS
— ICC (@ICC) June 24, 2025
थोडा वेळ पाऊस पडून गेल्यावर सामना पुन्हा सुरू झाला आहे. इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी केवळ 96 धावा हव्या आहेत. त्यामुळे जवळपास हा सामना इंग्लंड जिंकणार हे स्पष्ट झाले आहे.
इंग्लंड पुन्हा एकदा इतिहास रचण्याच्या जवळ
इंग्लंड आता लीड्स येथील पहिल्या कसोटीत पुन्हा एकदा इतिहास रचण्याच्या जवळ पोहचला आहे. इंग्लंडला आता हा सामना जिंकण्यासाठी १३० पेक्षा देखील कमी धावांची आवश्यकता आहे. जर इंग्लंडने हा सामना जिंकला तर तो भारताविरुद्ध दोनदा हा पराक्रम करणारा पहिला संघ ठरणार आहे.
इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट याने शानदार शतक झळकावून इंग्लंडला विजयाच्या जवळ पोहचवले आहे. तसेच जॅक क्रॉलीने देखील अर्धशतक करून त्याला चांगली साथ दिली आहे. अशातच गेल्या ९३ वर्षांत, टीम इंडियाने आतापर्यंत खेळलेल्या ५९० कसोटी सामन्यांमध्ये, फक्त एकदाच संघ भारताविरुद्ध ३७० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या गाठू शकला आहे.