जो रूट (फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG 5th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना ओव्हल येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताच्या पहिल्या डावातील २२४ धावांत संपुष्टात आला. प्रतिउत्तरात इंग्लंडने पहिल्या डावात २४७ धावां केल्या. प्रतिउत्तरात भारताने तिसऱ्या दिवशी २ गडी गमावून ७५ धावा केल्या आहेत. या सामन्यात दोन्ही संघाच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली आहे. दरम्यान इंग्लडच्या जो रूटने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. जो रूटने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. देशात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून जो रूटने सचिन तेंडुलकरला पिछाडीवर टाकले आहे.
२३ ते २७ जुलै दरम्यान ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटीत जो रूटने आपल्या संघासाठी १५० धावा केल्या आणि या काळात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज देखील बनला. मँचेस्टरममध्ये फलंदाजीचे अनेक विक्रम देखील रूटने अनेक मोडले. यानंतर तो इंग्लंडमध्ये भारताविरुद्ध २००० कसोटी धावा करणारा जगातील पहिलाच फलंदाज बनला आहे.
इंग्लंडच्या दिग्गज फलंदाज जो रूटने पाचव्या कसोटीत पहिल्या डावात २९ धावांची छोटेखाणी खेळी खेळली. यामध्ये त्याने २२ धावा करताच रूटने सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकला आहे. सचिन तेंडुलकरने भारतात ७२१६ धावा केल्या आहेत. या प्रकरणात, जो रूटने आता इंग्लंडमध्ये ७२२४ धावा करून सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. या यादीमधेय रूटपेक्षा फक्त ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग पुढे आहे. रिकी पॉन्टिंगने ऑस्ट्रेलियामध्ये ९२ कसोटी सामने खेळले असून या दरम्यान त्याने २३ शतके आणि ३८ अर्धशतकांसह एकूण ७५७८ धावा केल्या आहेत.
जो रूटने पाचव्या कसोटीत आणखी एक कामगिरी केली आहे. तो इंग्लंडमध्ये भारताविरुद्ध २००० कसोटी धावा करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. तथापि, रूट २९ धावा काढून बाद झाला. त्याला सिराजने आपल्या चेंडूवर एलबीडब्ल्यू केले. इंग्लंडमध्ये एखाद्या देशाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याबाबत सांगायचे झाले तर रूटनंतर अॅलिस्टर कुकचे नाव येते. त्याने १७ सामन्यांमध्ये ११९६ धावा केल्या आहेत. त्यानंतर ग्रॅहम गूचचा नंबर लागतो. ज्याने १० सामन्यांमध्ये ११३४ धावा काढल्या आहेत.
हेही वाचा : IND vs ENG : जसप्रीत बुमराहने मालिकेचा निरोप घेतल्यावर सिराज झाला भावुक! बूम-बूमने ‘मिया भाई’ला दिले उत्तर