मोहम्मद सिराज (फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG 5th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील पाचवा सामना ओव्हल येथे खेळला जात आहे. या सामन्यातील दोन दिवस संपले आहेत. भारताच्या पहिल्या डावातील २२४ धावांत संपुष्टात आला. प्रतिउत्तरात इंग्लंडने पहिल्या डावात २४७ धावांची मजल मारून २३ धावांची आघाडी घेतली होती. प्रतिउत्तरात भारताने तिसऱ्या दिवशी २ गडी गमावून ७५ धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वाल ५१ धावांवर आणि नाईट वॉचमन म्हणून आलेआ आकाश दीप ४ धावांवर नाबाद आहेत. दरम्यान इंग्लंडचहा पहिला डाव २४७ धावांवर गुंडाळत भारतीय गोलंदाजांनी मोठी कामगिरी केली. यामध्ये भारताच्या गोलंदाजी आक्रमणाची धुरा वाहणाऱ्या मोहम्मद सिराजने ४ विकेट्स घेऊन ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना चांगलाच अटीतटीचा होताना दिसत आहे. दुसऱ्या दिवशी दोन्ही संघाचे मिळून १६ गडी बाद झाले. भारताबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. विशेषतः मोहम्मद सिराजने इंग्लिश फलंदाजांवर चांगलच वर्चस्व राखलं. पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सिराजने ४ विकेट घेतल्या. त्याच्या कामगिरीच्या जोरावर इंग्लंडला २५० च्या आतमध्ये रोखण्यात यश आले आहे. या कामगिरीसह सिराजने कसोटी क्रिकेटमध्ये २०० बळींचा आकडा गाठला आहे.
हेही वाचा : भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची काढली लाज! आता पीसीबीने घेतला मोठा निर्णय
पाचव्या कसोटी सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने फक्त २०० बळींचा आकडा गाठला नाही तर एक मोठी कामगिरी देखील केली आहे. दरम्यान, त्याने भारताच्या दिग्गज सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले. सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण २०१ मिळवले आहेत. त्याच वेळी, या सामन्यात ४ बळी घेतल्यानंतर, सिराजने कसोटीत एकूण २०३ बळी घेऊन विकेट घेण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले.
याशिवाय, मोहम्मद सिराजने आणखी एक कामगिरी केली आहे. भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा सिराज हा २३ वा गोलंदाज ठरला आहे. त्याच वेळी, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० किंवा त्याहून अधिक बळी घेणारा २५ वा गोलंदाज बनला आहे. या यादीबद्दल बोलायचे झाले तर, अनिल कुंबळे अव्वल स्थानावर विराजमान आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक ९५३ विकेट्स घेतल्या आहेत. कुंबळेशिवाय, कोणताही भारतीय गोलंदाज ८०० बळींचा टप्पा गाठता आलेला नाही.
पाचव्या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लिश फलंदाज मोहम्मद सिराजकडून खप त्रासलेले दिसत होते. यादरम्यान, सिराजने एकूण १६.२ षटके गोलंदाजी करत ४ विकेट्स मिळवल्या. यादरम्यान, त्याने ८६ धावा दिल्या आहेत. सिराजने ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक आणि जेकब बेथेल यांची शिकार केली. तर सिराजला प्रसिद्ध कृष्णाने चांगली साथ देत त्यानेही ४ विकेट्स घेतल्या.