कुलदीप यादव आणि मोर्ने मॉर्केल(फोटो-सोशल मिडिया)
IND vs ENG 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथे खेळला जात आहे. पहिल्या डावात भारताने सर्वबाद ३५८ धावा केल्याया असून प्रतिउत्तरात इंग्लंडने सर्वबाद ६६९ धावा केल्या आहेत. यासोबत इंग्लंडने चौथ्या दिवशी ३११ धावांची आघाडी घेतली होती. प्रत्युउत्तरात भारताने पाचव्या दिवशी ३ विकेट्स गमावून २१० धावा केल्या आहेत. कर्णधार शुभमन गिलने १०० धावा तर वाशिंग्टन सुंदर १० धावांवर खेळत आहे. दरम्यान बॉलिंग प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी कुलदीप यादवबाबत मोठे विधान केले आहे.
अंतिम अकरामध्ये विशेषज्ञ गोलंदाज कुलदीप यादवचा समावेश करण्यासाठी भारताच्या शीर्ष सहा फलंदाजांनी अधिक सातत्यपूर्ण फलंदाजी करणे आवश्यक आहे असे मत बॉलिंग प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी वर्तविले. डावखुरा मनगट फिरकी गोलंदाज कुलदीपची मालिकेत निवड न झाल्याबद्दल आतापर्यंत बरीच चर्चा झाली आहे. भारत आणि इंग्लंडच्या माजी खेळाडूंनी त्याला संघात समाविष्ट करण्याचे समर्थन केले आहे कारण तो सामना जिंकणारा खेळाडू आहे. तथापि, आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी मजबूत करण्यासाठी भारताने अंतिम अकरामध्ये तीन अष्टपैलू खेळाडू निवडण्यास प्राधान्य दिले आहे.
या निर्णयामुळे मिश्र परिणाम मिळाले आहेत. कुलदीपला जागतिक दर्जाचा फिरकी गोलंदाज म्हणून वर्णन करताना मोर्केल म्हणाले की, भारत या गोलंदाजाला संघात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. आता तो ३१ जुलैपासून ओव्हल येथे सुरू होणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यातच खेळू शकेल. आम्ही कुलदीपसाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहोत पण त्यासाठी आम्हाला आमच्या पहिल्या सहा खेळाडूंनी सातत्याने धावा काढण्याची आवश्यकता आहे जेणेकरून आम्ही कुलदीपसारख्या खेळाडूला संघात समाविष्ट करू शकू. पहिल्या डावात भारतीय जलद गोलंदाजांच्या सामान्य कामगिरीनंतर मॉर्केलने माध्यमांना संबोधित केले. मला वाटते की जर तो संघात आला तर आपण कसे संतुलन निर्माण करू शकतो आणि आपली फलंदाजी क्रमवारी थोडी लांब आणि मजबूत कशी बनवू शकतो हे आपल्याला पहावे लागेल.