भारत प्लेइंग ११(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा कसोटी सामना ३१ जुलैपासून केनिंग्टन ओव्हल येथे खेळला जात आहे. या मालिकेतील चार सामने खेळून झाले आहेत. इंग्लंडने या तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. तर एक सामना ड्रॉ झाला आहे. ओव्हलसामन्यापूर्वी झालेल्या नाणेफेकीत इंग्लंडने बाजी मारली असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय इंग्लंडकडून घेण्यात आला आहे. तर भारत फलंदाजी करत आहे.. या सामन्यासाठी दोन्ही संघांकडून ४-४ बदल करण्यात आले आहेत. इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्स या सामन्यातून बाहेर आहे. दुसरीकडे, मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह भारताकडून खेळताना दिसणार नाही.
भारतीय संघात बुमराहसह चार बदल केले गेले आहेत. बुमराह व्यतिरिक्त, शार्दुल ठाकूर आणि अंशुल कंबोज देखील भारताच्या प्लेइंग इलेव्हन नाहीत. या तिघांच्या जागी प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप आणि करुण नायर यांचा संघात पुन्हा समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा : IND vs ENG 5th Test : भारताच्या संघासमोर करो या मरो की स्थिती! ऑली पाॅपने नाणेफेक जिंकून करणार गोलंदाजी
गेल्या आठवड्यात मँचेस्टर कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी ऋषभ पंतला पायाला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो पाचव्या सामन्यातून बाहेर पडला होता. त्याच्या जागी ध्रुव जुरेल शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघात यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून खेळत आहे. तर दुसरीकडे, इंग्लंडकडून त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार बदल करण्यात आले आहेत. कर्णधार बेन स्टोक्स खांद्याच्या दुखापतीमुळे पाचव्या कसोटीतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ऑली पोप ओव्हलमध्ये इंग्लंड संघांची धुरा सांभाळत आहे.
ओव्हलमध्ये खेळवण्यात येत असलेल्या कसोटी सामन्यासाठी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि ब्रायडन कार्स यांना विश्रांती दिली गेली आहे. त्यासोबतच, फिरकी गोलंदाज लियाम डॉसनला देखील संघाच्या बाहेर ठेवण्यात आले आहे. त्याच्या जागी गस अॅटकिन्सन, जोश टंग आणि जेमी ओव्हरटन अंतिम अकरामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. त्याच वेळी, स्टोक्सच्या जागी जेकब बेथेलचा संघात समावेश केला गेला आहे.
हेही वाचा : IND vs ENG: ओव्हल कसोटीला सुरवात; गंभीर-गिलला सतावणार ‘ती’ गोष्ट; वाचा सविस्तर
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), करुण नायर, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, मोहम्मद सिराज.
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), ख्रिस वोक्स, गस अॅटकिन्सन, जेमी ओव्हरटन, जोश टंग.