Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND VS ENG Test : जसप्रीत बुमराह पाचवा कसोटी सामना खेळणार? गौतम गंभीरं दिले अचूक उत्तर

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा भारतीय संघासाठी शेवटचा सामना खेळणार की नाही यावर अजुनही प्रश्नचिन्ह आहे. यावर आता भारताचे मुख्य कोच गौतम गंभीर यांनी या संदर्भात सविस्तर उत्तर दिले आहे. 

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 28, 2025 | 02:04 PM
फोटो सौजन्य – X

फोटो सौजन्य – X

Follow Us
Follow Us:

भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये सुरु असलेल्या पाच सामन्याच्या कसोटी मालिकेचा शेवटचा सामना हा 31 जुलैपासुन सुरु होणार आहे. भारताच्या संघाने चौथा सामना ड्राॅ केला, यामध्ये भारताच्या फलंदाजांनी धुव्वाधार फलंदाजी केली. आता शेवटचा सामना भारताच्या संघाने जिंकला तर ही मालिका बरोबरीत संपेल. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा भारतीय संघासाठी शेवटचा सामना खेळणार की नाही यावर अजुनही प्रश्नचिन्ह आहे. यावर आता भारताचे मुख्य कोच गौतम गंभीर यांनी या संदर्भात सविस्तर उत्तर दिले आहे. 

इंग्लंड मालिका सुरू होण्यापूर्वीच जसप्रीत बुमराह फक्त ३ सामने खेळणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. चौथ्या कसोटीच्या समाप्तीनंतर जसप्रीतने मालिकेत ३ सामने खेळले आहेत. म्हणूनच ओव्हल येथे होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यासाठी जसप्रीत आपला निर्णय बदलेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

WTC Points Table : मँचेस्टर कसोटीनंतर कोणत्या संघाचा झाला फायदा? जाणून घ्या कोण पहिल्या स्थानावर विराजमान…

मँचेस्टर कसोटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गौतम गंभीरला जसप्रीत बुमराह पुढील सामना खेळण्याच्या शक्यतेबद्दल विचारण्यात आले. गंभीर म्हणाला, ‘याबद्दल अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही आणि जसप्रीत बुमराह शेवटचा कसोटी सामना खेळेल की नाही हे निश्चित झालेले नाही. जो कोणी खेळेल तो या देशासाठी आपले काम करण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल.’

पत्रकार परिषदेदरम्यान, गौतम गंभीरला भारतीय गोलंदाजांच्या दुखापतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. खरंतर, चौथ्या कसोटीपूर्वी सराव करताना अर्शदीपच्या बोटावर जखम झाली होती. याशिवाय, आकाश दीपलाही दुखापत झाली होती आणि त्याला मँचेस्टर कसोटीतून बाहेर पडावे लागले. गंभीरने अपडेट देताना सांगितले की, ‘सर्व वेगवान गोलंदाज तंदुरुस्त आहेत आणि कोणालाही कोणतीही दुखापत झालेली नाही.’

WCL 2025 : रवी बोपाराच्या शतकासमोर युवी-पठाणची धमाकेदार खेळी पडली फिकी, इंडिया चॅम्पियन्सचा लज्जास्पद पराभव

अंशुल कंबोजने चौथ्या सामन्यात कसोटी पदार्पण केले आणि तो फक्त एकच बळी घेण्यात यशस्वी झाला. गौतम गंभीरने माहिती दिली आहे की इतर वेगवान गोलंदाज तंदुरुस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत आकाश दीप त्याच्या जागी संघात येऊ शकतो. जर जसप्रीत खेळला नाही तर त्याच्या जागी अर्शदीप सिंगला संधी दिली जाऊ शकते. भारताच्या संघामध्ये दुखापतीचे प्रमाण देखील वाढले आहे, त्यामुळे नितिश कुमार रेड्डी हा देखील मालिकेबाहेर झाला आहे. 

आता ऋषभ पंत देखील मालिकेधुन बाहेर झाला आहे, त्याच्या जागेवर आता नारायण जगदीसन याला संघामध्ये स्थान मिळाले आहे, त्याला शेवटच्या सामन्यामध्ये पदार्पण करण्याची संधी मिळणार की नाही हे पाहणे मनोरंजक ठरेल.

Web Title: Ind vs eng test will jasprit bumrah play fifth test match gautam gambhir gave the correct answer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2025 | 01:16 PM

Topics:  

  • cricket
  • Gautam Gambhir
  • IND Vs ENG
  • Jasprit Bumrah
  • Sports
  • Team India

संबंधित बातम्या

Cricket News: World Cup 2027 पूर्वी टीम इंडियाची अग्निपरीक्षा! किती अन् कोणत्या संघांविरुद्ध खेळणार एकदिवसीय सामने?
1

Cricket News: World Cup 2027 पूर्वी टीम इंडियाची अग्निपरीक्षा! किती अन् कोणत्या संघांविरुद्ध खेळणार एकदिवसीय सामने?

Kabbadi : निवड चाचणी स्पर्धेत संघर्ष मंडळ, श्री स्वामी समर्थ मंडळाची विजयी सलामी
2

Kabbadi : निवड चाचणी स्पर्धेत संघर्ष मंडळ, श्री स्वामी समर्थ मंडळाची विजयी सलामी

Carrom Tournament : महापौर शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता
3

Carrom Tournament : महापौर शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

Virat Kohli: विराटचा ‘किंग’ अंदाज पण गौतमचा ‘गंभीर’ चेहरा! डगआउटमधील ‘तो’ फोटो झाला व्हायरल; चाहत्यांनी केलं जोरदार ट्रोल
4

Virat Kohli: विराटचा ‘किंग’ अंदाज पण गौतमचा ‘गंभीर’ चेहरा! डगआउटमधील ‘तो’ फोटो झाला व्हायरल; चाहत्यांनी केलं जोरदार ट्रोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.