Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND VS ENG : यशस्वी जयस्वालचा फॉर्म सुसाट! दिग्गज गावस्करांचा विक्रम मोडला, असे करणारा ठरला पहिलाच भारतीय खेळाडू.. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना एजबॅस्टन येथे खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार सलामीवीर यशस्वी जयस्वाल मोठी कामगिरी केली आहे. त्याने सुनील गावस्करांचा विक्रम मोडीत काढला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 05, 2025 | 04:03 PM
IND VS ENG: Yashasvi Jaiswal's form is good! He broke the record of the legendary Gavaskar, becoming the first Indian player to do so..

IND VS ENG: Yashasvi Jaiswal's form is good! He broke the record of the legendary Gavaskar, becoming the first Indian player to do so..

Follow Us
Close
Follow Us:

IND VS ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची मालिका खेळवली जात असून या मालिकेतील दुसरा कसोटी सामना एजबॅस्टन येथे खेळला जात आहे. टीम इंडियाने या सामन्यावर चांगलीच पकड जमवली आहे. तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला ४०७ धावांवर सर्वबाद केले आणि १८० धावांची आघाडी मिळवली आहे. त्यानंतर, तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस टीम इंडियाने १ विकेट गमावून ६४ धावा केल्या होत्या. या दरम्यान भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे.

शुक्रवारी (४ जुलै) रोजी बर्मिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद २००० धावा पूर्ण केल्या आहेत. यासह त्याने भारतीय फलंदाज बनून एक नवा विक्रम रचल आहे.

यशस्वी जयस्वालला कसोटी क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या डावात फक्त १० धावांची गरज होती आणि सहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ब्रायडन कार्सेला चौकार मारून त्याने हे लक्ष्य सहज गाठले. तथापि, तो  दुसऱ्या डावात २८ धावा काढून बाद झाला. त्यानंतर  जयस्वालला जोश टोंगेने आपला बळी बनवले.

हेही वाचा : Grand Chess Tour : भारताच्या डी गुकेशच ६४ घरांचा ‘राजा’, कार्लसनला पुन्हा दिला दणका; असा झाला खेळ..

भारत आणि इंग्लंडमधील दुसरा कसोटी सामना हा यशस्वीचा भारताकडून खेळताना २१ वा कसोटी सामना आहे. त्याच्या आधी कसोटी सामन्यांमध्ये सर्वात जलद २००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम सुनील गावस्कर यांनी नोंदवला होता. गावस्कर यांनी ७ ते १२ एप्रिल १९७६ दरम्यान पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध २३ व्या कसोटी सामन्यात २००० धावांचा टप्पा पार केला होता. गौतम गंभीर २४ कसोटींसह तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे.  तर राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांनी भारतासाठी त्यांच्या २५ व्या कसोटी सामन्यात २००० धावांचा गड सर केला होता.

सर्वात जलद २००० धावा करणारा भारतीय खेळाडू (सामन्यांद्वारे)

  1. यशस्वी जयस्वाल – २१
  2. सुनील गावस्कर – २३
  3. गौतम गंभीर – २४
  4. राहुल द्रविड – २५
  5. वीरेंद्र सेहवाग – २५

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद २००० धावा करण्याचा विक्रम महान डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर कायम आहे. ब्रॅडमनने ऑस्ट्रेलियन संघासाठी त्यांच्या १५ व्या कसोटी सामन्यातच २००० धावांचा टप्पा पार केला होता.

हेही वाचा : SL VS BAN : माजी कर्णधारासह 6 खेळाडू बाहेर, T20 मालिकेसाठी बांगलादेश संघाची घोषणा

कसोटीत सर्वात जलद २००० धावा (सामन्यांद्वारे)

  1. डॉन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया) – १५ कसोटी
  2. जॉर्ज हेडली (वेस्ट इंडिज) – १७ कसोटी
  3. मायकेल हसी (ऑस्ट्रेलिया) – २० कसोटी
  4. मार्नस लाबुशेन (ऑस्ट्रेलिया) – २० कसोटी
  5. यशस्वी जयस्वाल (भारत) – २१ कसोटी

जयस्वालने डावांच्या बाबतीत सांगायच झाल्यास राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. त्यांच्या खेळण्याच्या काळात, द्रविड आणि सेहवागने ४० व्या कसोटी डावात २००० धावांचा टप्पा ओलांडला होता.

Web Title: Ind vs eng yashasvi jaiswal breaks legendary gavaskars record in second test

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 04:03 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • Rahul Dravid
  • Sunil Gavaskar
  • Yashasvi Jaiswal

संबंधित बातम्या

‘चेहऱ्यावर हसू का दिसत नाही..’ दिनेश कार्तिकच्या विधानाने खळबळ; अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी दरम्यान नेमकं काय घडलं?
1

‘चेहऱ्यावर हसू का दिसत नाही..’ दिनेश कार्तिकच्या विधानाने खळबळ; अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी दरम्यान नेमकं काय घडलं?

Asia cup 2025 साठी ‘या’ 5 खेळाडूंची निवड, मात्र मैदानात उतरण्याची आशा धूसर; कारण आले समोर..
2

Asia cup 2025 साठी ‘या’ 5 खेळाडूंची निवड, मात्र मैदानात उतरण्याची आशा धूसर; कारण आले समोर..

IND vs PAK : PCB ची घाई येणार अंगलट? ‘त्या’ घोषणेमुळे भारताची लागणार लॉटरी; युवा संघ पाकला पाजणार पाणी
3

IND vs PAK : PCB ची घाई येणार अंगलट? ‘त्या’ घोषणेमुळे भारताची लागणार लॉटरी; युवा संघ पाकला पाजणार पाणी

विराट कोहली नाही… या 5 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला आशिया कप; पहा संपूर्ण यादी
4

विराट कोहली नाही… या 5 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला आशिया कप; पहा संपूर्ण यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.