Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG: ‘चूक इथेच झाली…’; भारताच्या पराभवानंतर श्रेयस अय्यरचा संयम सुटला, ‘या’ खेळाडूवर फोडलं खापर

Shreyas Iyer Statement On India Loss against eng: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला चार विकेट्सने पराभव पत्करावा लागला. सामन्यानंतर, कर्णधार श्रेयस अय्यरने या पराभवाचे खरे कारण सांगितले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 05, 2026 | 01:53 PM
IND vs ENG: ‘चूक इथेच झाली…’; भारताच्या पराभवानंतर श्रेयस अय्यरचा संयम सुटला, ‘या’ खेळाडूवर फोडलं खापर
Follow Us
Follow Us:
  • पराभवानंतर श्रेयस अय्यरचा संयम सुटला
  • ‘या’ खेळाडूवर फोडलं खापर
  • श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाखाली एकही विजय नाही
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळला गेला. टीम इंडियाने या सामन्यात वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी दिली. नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि २० षटकांत १९० धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली, परंतु जेकब बेथेलच्या नाबाद ७६ धावांनी त्यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. यामुळे भारतीय संघाला चार विकेट्सने पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाचा नवीन टी-२० कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पहिल्या विजयाची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. दरम्यान, २०२१ नंतर प्रथमच भारतीय संघाने सलग तीन पूर्ण टी-२० आंतरराष्ट्रीय सामने गमावले आहेत. या पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यरचा संताप अनावर झाला आणि त्याने आपली नाराजी व्यक्त केली.

ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२६ च्या माध्यमातून महाराष्ट्र डिजिटल क्रिएटिव्ह अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रेयस अय्यरने या खेळाडूवर फोडले खापर

पराभवानंतर श्रेयस अय्यर निराश आणि संतप्त दिसत होता , पण भारतीय कर्णधाराने पराभवासाठी कोणत्याही एका खेळाडूला दोष देण्यास स्पष्टपणे नकार दिला. एका क्षणी, १६ षटकांत इंग्लंडची धावसंख्या ५ विकेट्स गमावून १४२ होती आणि भारत विजयाच्या दिशेने वाटचाल करत होता. पण त्यानंतर सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटले.

कर्णधार श्रेयस अय्यरने १७ वे षटक रवी बिश्नोईकडे सोपवले . षटकाची सुरुवात नो-बॉलने झाली, ज्यानंतर जेकब बेथेलने फ्री हिटवर षटकार ठोकला. त्यानंतर बिश्नोईने पुन्हा नो-बॉल टाकला. बेथेलने याचा पुरेपूर फायदा घेतला आणि संपूर्ण षटकात एकापाठोपाठ एक मोठे फटके मारले. इंग्लंडने या षटकात २९ धावा करून सामन्याचे पारडे पूर्णपणे आपल्या बाजूने फिरवले.

पराभवासाठी कोणताही एक खेळाडू जबाबदार नाही

श्रेयस अय्यर म्हणाला की, त्याला पराभवासाठी कोणत्याही एका खेळाडूला दोष द्यायचा नाही. श्रेयस म्हणाला की, ‘सामना आपल्या हातून कुठे निसटला हे आपल्या सर्वांना माहीत आहे, पण मला कोणत्याही एका खेळाडूवर बोट दाखवायचे नाही. पहिल्या नो-बॉलनंतर रवी पुनरागमन करेल असा मला विश्वास होता. हो, १७ व्या षटकामुळे आम्हाला फटका बसला, पण ते त्यातून शिकतील. खेळपट्टीवर चेंडू ज्याप्रकारे बाउन्स करत होता, त्या हिशोबाने १९० ही एक शानदार धावसंख्या होती. पहिल्या १५ षटकांपर्यंत सामन्यावर आमचे पूर्ण वर्चस्व होते, पण त्यानंतर जेकब बेथेलने उत्कृष्ट फलंदाजी केली.’

श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाखाली एकही विजय नाही

श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाखाली भारतीय संघाला अद्याप एकही टी२० आंतरराष्ट्रीय सामना जिंकता आलेला नाही . आयर्लंड दौऱ्यावरील दोन्ही टी२० आंतरराष्ट्रीय सामने भारताने गमावले. त्यानंतर, इंग्लंड दौऱ्यावरील पहिला टी२० आंतरराष्ट्रीय सामना पावसामुळे रद्द झाला. आता, भारतीय संघ मँचेस्टर टी२० आंतरराष्ट्रीय सामना हरला आहे. श्रेयसच्या नेतृत्वाखाली  भारताने चारपैकी ३ सामने हरले आहे.या विजयामुळे इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

IND Vs ENG Live: श्रेयस अय्यरचं कॅप्टन्सीचं ग्रहण जाईना! अजून एक पराभव पदरात, इंग्लंडचा विजय

Web Title: Shreyas iyer statement on ravi bishnoi after india loss t 20 vs eng

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 01:49 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • IND vs ENG T-20 Match
  • Ravi Bishnoi
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

ENG Vs IND: इंग्लंडच्याच भूमीत तिरंगा फडकला! ऐतिहासिक लॉर्ड्सवर ‘दादा’ स्टाईल जल्लोष; पाहा Viral Video
1

ENG Vs IND: इंग्लंडच्याच भूमीत तिरंगा फडकला! ऐतिहासिक लॉर्ड्सवर ‘दादा’ स्टाईल जल्लोष; पाहा Viral Video

32 वर्षांची पराभवाची परंपरा कायम! FIH Hockey मध्ये भारताचा दारुण पराभव, इंग्लंडने थेट…
2

32 वर्षांची पराभवाची परंपरा कायम! FIH Hockey मध्ये भारताचा दारुण पराभव, इंग्लंडने थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.