फोटो सौजन्य – X (Bangladesh Cricket)
श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यामध्ये सध्या एक दिवसीय मालिका सुरू आहे या मालिकेमध्ये तीन सामने खेळवले जाणार आहेत. आज या मालिकेचा दुसरा सामना खेळवला जाणार आहे, पहिल्या सामन्यांमध्ये श्रीलंकेच्या संघाने विजय मिळवला होता. त्यामुळेच श्रीलंकेच्या संघाकडे 1–0 अशी मालिकेमध्ये आघाडी आहे. एकदिवसीय मालिका झाल्यानंतर बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये तीन सामन्यांची t20 मालिका खेळवली जाणार आहे या मालिकेला सुरुवात 10 जुलैपासून होणार आहे. या मालिकेसाठी आता बांगलादेशच्या संघाने t20 संघाची घोषणा केली आहे.
या मालिकेचा शेवटचा सामना हा 16 जुलैला होणार आहे, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने t20 मालिकेसाठी एकूण 16 खेळाडूंचा संघ घोषित केला आहे. यामध्ये अनेक अनुभवी खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. माजी कर्णधार नझमुल हुसेन शांतो संघाबाहेर आहे. त्याने फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपद सोडले होते, आता तो संघाबाहेर आहे. शांतो व्यतिरिक्त सौम्या सरकार, हसन महमूद, तन्वीर इस्लाम, नाहिद राणा आणि खालिद अहमद हे देखील संघाबाहेर आहेत. ते पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या t20 संघाचा भाग होते.
अष्टपैलू मोहम्मद सैफुद्दीन एका वर्षानंतर t20 संघात परतला आहे. तो चेंडू आणि बॅट दोन्हीने चमत्कार करू शकतो. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज तस्किन अहमद व्यतिरिक्त, डावखुरा वेगवान गोलंदाज शोरिफुल इस्लाम, मुस्तफिजूर रहमान आणि फिरकी गोलंदाज नसुम अहमद हे देखील t20 संघात परतले आहेत.
Bangladesh announce T20I squad for Sri Lanka series :
Litton (c), Tanzid, Emon, Naim, Hridoy, Jaker, Shamim, Miraz, Rishad, Mahedi, Nasum, Taskin, Mustafiz, Shoriful, Tanzim, and Saifuddin.#SLvsBAN pic.twitter.com/KgGK6A8Nlc
— Raisul Rifat (@raisul_rifat88) July 4, 2025
सध्या दोन्ही संघ एकदिवसीय मालिका खेळत आहेत. श्रीलंकेने पहिला सामना 77 धावांनी जिंकला, दुसरा सामना 5 जुलै रोजी आणि तिसरा सामना 8 जुलै रोजी खेळला जाईल. या मालिकेत यजमान श्रीलंका 1-0 ने आघाडीवर आहे. याआधी दोन्ही संघांमध्ये 2 कसोटी सामनेही खेळले गेले होते. पहिला सामना अनिर्णित राहिला, तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने डाव आणि 78 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला.
लिटन दास (कर्णधार), तनजीद हसन तमीम, परवेझ हुसेन इमॉन, मोहम्मद नईम शेख, तौहीद हृदया, झाकेर अली अनिक, शमीम हुसेन पटवारी, मेहदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, शाक महेदी हसन, नसुम अहमद, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल रहमान, शरीफउद्दीन मोहम्मद शेख, शरीफउद्दीन, शरीफ उद्दीन.