डी गुकेश आणि मॅग्नस कार्लस(फोटो-सोशल मीडिया)
D Gukesh vs Magnus Carlsen : भारताचा स्टार बुद्धिबळपटू आणि सध्याचा विश्वविजेता डी गुकेशने क्रोएशियाच्या झाग्रेब येथे सुरू असलेल्या ग्रँड बुद्धिबळ टूरच्या सहाव्या फेरीत नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनला पराभूत करून मोठे यश मिळवले आहे. या विजयासह डी गुकेशने आता स्पर्धेत १० गुणांची आघाडी घेतली आहे. सुपर युनायटेड रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या तीन फेऱ्या पहिल्या दिवशी संपल्यानंतर डी गुकेशने संयुक्तपणे आपले पहिले स्थान कायम ठेवले होते.
चौथ्या फेरीत डी गुकेशचा सामना उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हशी झाला आणि त्यानंतर पाचव्या फेरीत अमेरिकन ग्रँडमास्टर फॅबियानो कारुआनाला हरवून त्याने कार्लसनशी आपला सामना निश्चित केला. नॉर्वेचा बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनने डी गुकेशसोबतच्या या सामन्यापूर्वी विधान केले होते की तो हा सामना अशा प्रकारे खेळेल जणू तो एखाद्या कमकुवत खेळाडूशी सामना करत आहे. आता मॅग्नसला त्याच्या विधानाचा पश्चात्ताप होत असावा. डी गुकेशने रॅपिड कॅटेगरीत शानदार कामगिरी केली आणि कार्लसनला हरवले, ज्यामध्ये दोघांमधील तीन सामन्यांपैकी हा पहिला सामना होता. आता उर्वरित २ सामने ब्लिट्झ स्वरूपात खेळले जातील.
हेही वाचा : कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात द्विशतके ठोकणारे खेळाडू, पहा यादी
मॅग्नसला हरवणे नेहमीच खास असते मॅग्नस कार्लसनला हरवल्यानंतर डी गुकेशनेही आनंद व्यक्त केला, ज्यामध्ये त्याने त्याच्या विधानात म्हटले आहे की, कार्लसनला हरवणे नेहमीच खास असते. या विजयामुळे माझा आत्मविश्वास आणखी वाढेल. माझी सुरुवात सुरुवातीपासूनच चांगली नव्हती. मी बऱ्याच गोष्टी बिघडवल्या, विजयानंतर मला चांगले वाटत आहे.
गुकेशशी खेळायचे म्हणजे कम्प्युटरशी खेळण्यासारखे दरम्यान, या सामन्यादरम्यान कॉमेंट्री करणारे गॅरी कास्पारोव्ह यांनीदेखील गुकेशचं कौतुक केले. गुकेशशी खेळायचं म्हणजे कम्प्युटरशी खेळण्यासारखं आहे. तो सर्वात जिद्दी खेळाडू आहे. प्रत्येक गेममध्ये त्याच्याकडे खूप साऱ्या लाईफ असतात. त्यामुळे तुम्हाला त्याला प्रत्येक गेममध्ये किमान पाच वेळा तरी हरवावं लागते.
हेही वाचा : Ind vs Eng : दुसऱ्या कसोटीमध्ये मैदानातच राडा! यशस्वीने DRS घेताच स्टोक्सचा झाला तिळपापड; पहा व्हिडिओ
तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव ४०७ धावांवर आटोपला. इंग्लंडकडून फलंदाजी करताना जेमी स्मिथने सर्वाधिक १८४ धावा फटकावल्या. त्याशिवाय हॅरी ब्रूकने देखील १५८ धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांनी शानदार गोलंदाजी केली करून अनुक्रमे ६ आणि ४ विकेट्स घेतल्या. भारताने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाअखेर एक गडी गमावून ६४ धावा केल्या आहेत. केएल राहुल २८ तर करुण नायर ७ धावांवर नाबाद आहे.