विशाखापट्टणममध्ये किवीचे भारतासमोर २१६ धावांचे लक्ष्य(फोटो-सोशल मीडिया)
IND vs NZ 4th T20I : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येत आहे.या मालिकेतील चौथा सामना आज विशाखापट्टणम येथील ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. टॉस गमावणाऱ्या न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करत सलामीवीर टिम सेफर्टच्या अर्धशतकाच्या जोरावर ७ गडी गमावून २१५ धावा केल्या आहेत. भारताला हा सामना जिंकण्यासाठी २१६ धावा कराव्या लागणार आहेत. भारताकडून अर्शदीप सिंगने २ विकेट्स घेतल्या आहेत.
या समान्यापूर्वी भारताने नानेफक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे आणि न्यूझीलंड संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले . भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवचा हा निर्णय किवीच्या सलामीवीरांनी चुकीचा ठरवत न्यूझीलंडच्या टिम सेफर्ट आणि डेव्हॉन कॉनवे या सलामीवीरांनी ८ षटकातच १०० धावा जोडल्या. या दरम्यान, पॉवरप्लेमध्ये या जोडीने भारतीय गोलंदाजांवर चांगलाच हल्लाबोल चढवला. पॉवरप्लेमध्ये यांनी ६ ओव्हरमध्येच ७१ धावा केल्या. टिम सेफर्ट अधिक आक्रमक दिसला. त्याने फक्त २५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
Innings Break! A target of 2⃣1⃣6⃣ runs in Vizag for #TeamIndia 🎯 Chase on the other side ⏳ Scorecard ▶️ https://t.co/GVkrQKKyd6 #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/4o0jnVFbFT — BCCI (@BCCI) January 28, 2026
टिम सेफर्ट आणि डेव्हॉन कॉनवे यांनी ८.२ षटकात १०० धावांची भागीदारी रचली. त्यानंतर डेव्हॉन कॉनवे २३ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकाररांच्या मदतीने ४४ धावांची खेळी करून बाद झाला. त्याला कुलदीप यादवने माघारी पाठवले. त्यानंतर मैदानात आलेला रचीन रवींद्र काही खास करू शकला नाही. त्याला जसप्रीत बूमराहने बाद केले. ग्लेन फिलिप्स २४ धावा, मार्क चॅपमन ९ धावा, कर्णधार मिशेल सॅन्टनर ११ धावा, झकरी फॉल्केस १३ धावा करून बाद झाले. परंतु एका बाजूने डॅरिल मिशेलने १८ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकरांच्या मदतीने नाबाद ३९ धावा केल्या आणि संघाचा स्कोअर २०० च्या पुढे घेऊन गेला. मॅट हेन्री ६ धावांवर नाबाद राहिला. भारताकडून अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर जसप्रीत बुमराह आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : टिम सेफर्ट (डब्ल्यू), डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिशेल सॅन्टनर (क), झकरी फॉल्केस, मॅट हेन्री, ईश सोधी, जेकब डफी
भारत प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (डब्ल्यू), सूर्यकुमार यादव (क), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, हर्षित राणा, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह






