पलवाशा मोहम्मद झई खान आणि दानिश करनेरिया(फोटो-सोशल मीडिया)
Ind vs Pak war : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. सध्याची परिस्थिती पाहता दोन्ही देश युद्धाकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहेत. त्याचा थेट परिणाम खेळावर देखील दिसू लागला आहे. काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्यांतर भारतात संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर, भारताने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून हवाई हल्ल्यात पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तान जास्त बावचळला आहे.
८ मे च्या रात्री पाकिस्तानकडून भारतीय शहरांवर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु भारतीय सैन्याने त्यांचे हे प्रयत्न उधळून लावले आहेत. असे असताना पाकिस्तानी सिनेटर पलवाशा मोहम्मद झई खान यांनी चुकीचे विधान व्हायरल होत आहे. भारताबद्दलचे त्यांच एक प्रक्षोभक विधान सध्या व्हायरल झालेया आहे. आता माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने त्या महिला नेत्याला चोख उत्तर दिले आहे.
याबबत अधिक माहिती अशी की, बिलावल भुट्टो यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे नेते पलवाशा मोहम्मद झई खान यांनी अयोध्या राम मंदिराबाबत प्रक्षोभक विधान केले होते. यावेळी त्यांनी म्हटले होते की, अयोध्येतील नवीन बाबरी मशिदीची पहिली वीट पाकिस्तानी सैन्य रचणाऱ्य आहे. त्यांनी २९ एप्रिल रोजी पाकिस्तानच्या वरिष्ठ सभागृहात आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर पलवशाचे हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
आता पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश करनेरियाने त्या महिला नेत्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानचा हिंदू क्रिकेटपटू दानिश कनेरियाने पलवाशा मोहम्मद झई खान यांच्या राम मंदिराबाबतच्या चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे आणि ते मुंगेरीलाल यांचे गोड स्वप्न असल्याचे देखील म्हटले आहे. हे उल्लेखनीय आहे की दानिश कनेरियाने वारंवार दावा केला आहे की पाकिस्तान क्रिकेट संघात त्याच्याशी भेदभाव करण्यात आला आहे.
निवृत्त भारतीय लष्करी मेजर गौरव आर्य यांच्याकडून देखील पलवशांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. त्यांच्या भारतविरोधी विधानावर गौरव आर्य म्हणाले होते की, ही स्वप्ने पाहणाऱ्या पाकिस्तानला राम मंदिर कुठे आहे हे देखील माहित नाही. अयोध्या उत्तर प्रदेशात आहे, जिथे प्रत्येक मूल शस्त्रे घेऊन जन्माला येत असते.