पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रवी शास्त्री(फोटो-सोशल मीडिया)
Ind vs Pak war : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्याला भारतीय सैन्याने योग्य उत्तर दिले आहे. अशातच भारतीय सैन्य आणि भारत सरकारचे भारतीय जनतेकडून कौतुक होत आहे. अशातच लष्करी तणावादरम्यान, माजी कर्णधार रवी शास्त्रींकडून मोदी सरकारचे कौतुक करण्यात आले आहे. पाकिस्तानविरुद्ध केलेल्या कारवाईबद्दल माजी अष्टपैलू खेळाडू आणि भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक शास्त्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचे तसेच भारतीय लष्कराचे कौतुक केले आहे. शास्त्रींनी मोदींचे सर्वकालीन सर्वोत्तम पंतप्रधान म्हणून वर्णन केले आहे.
शास्त्री शुक्रवारी अधिकृत एक्स हँडलवरून लिहिले की, ‘मी माझ्या क्रीडा कारकिर्दीत अनेक संघांना एकत्र येताना पाहत आलो आहे, परंतु १५० कोटी लोकसंख्या असलेल्या भारताने एकत्रितपणे ताकदीने मैदानात उतरण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे आपल्या भव्य सशस्त्र दलांच्या आणि सर्वकालीन महान व्यक्ती नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या सरकारच्या नेतृत्वामुळे घडले आहे. मी तुम्हाला नमन करतो आणि नमस्कार करतो! जय हिंद’ शास्त्री यांनी म्हटले आहे.
भारतीय सैन्याचा अभिमान : सूर्यकुमार यादव
भारताचा स्टार फलंदाज आणि टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव याने शुक्रवारी एक संदेश पोस्ट केला, ज्याने भारतीय सैन्यासाठी एक संदेश पोस्ट केला. त्याने लिहिले आहे की, पाकिस्तानविरुद्ध दिलेल्या शानदार उत्तराचा त्याला खूप अभिमान आहे. तसेच तो पुढे लिहितो की, ‘माझ्या सैन्याचा आणि त्यांच्या प्रतिहल्ल्याचा खूप अभिमान आहे.’ तुमच्यामुळेच आम्ही आमच्या घरात सुरक्षित आहोत. सीमेवर तुमच्या ताकदीबद्दल आणि आमच्या संरक्षणाबद्दल तुम्हाला खूप खूप सलाम. आम्ही तुमचे आभारी आहोत, जय हिंद.’ असे यंडाव याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
भारतीय संघ जूनमध्ये इंग्लंडचा दौऱ्यावर जाणार आहे. जिथे संघ इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र, या मालिकेपूर्वी टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि यशस्वी कर्णधार रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर आता अशीही चर्चा समोर आली आहे की, विराट कोहली देखील कसोटीला अलविदा म्हणण्याचा विचार करत आहे. विराट कोहलीबाबत एक धक्कादायक बातमी पुढे येत आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराट कोहलीने देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता, त्याने बीसीसीआयलाही याबद्दल माहिती देखील दिली होती. तथापि, बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्याला निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती करण्यात आली आहे.