Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SL: गिल-युगाची सुरुवात! श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाची पहिली कसोटी परीक्षा; कधी आणि कुठे पाहाल सराव सामना?

India vs Sl test warm up match live Streaming: भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिका १५ ऑगस्टपासून सुरू होत आहे. त्याआधी भारतीय संघ आणि श्रीलंका इलेव्हन यांच्यात सरवा सामना खेळला जाणार आहे. हा सामना कधी आणि कुठे पाहू शकता, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 06, 2026 | 02:21 PM
IND vs SL: गिल-युगाची सुरुवात! श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाची पहिली कसोटी परीक्षा; कधी आणि कुठे पाहाल सराव सामना?
Follow Us
Follow Us:
  • भारत विरुद्ध श्रीलंका सराव सामना
  • कधी आणि कुठे पाहाल सराव सामना?
  • सामना किती वाजता सुरू होईल?

भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेविरुद्ध लाल चेंडूच्या क्रिकेटमधील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर रवाना झाला आहे. १५ ऑगस्टपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होईल. आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) २०२५-२७ च्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्याआधी टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. चार दिवसांसाठी नियोजित असलेला हा सराव सामना, संघ व्यवस्थापन आणि आयोजक यांच्या परस्पर संमतीने नंतर तीन दिवसांचा करण्यात आला आहे. हा सामना कधी आणि कुठे पाहू शकता, जाणून घेऊयात.

PAK vs WI: पाकिस्तानच्या विजयामुळे WTC गुणतालिकेत उलथापालथ; टीम इंडियालाही बसला फटका, भारत कितव्या स्थानी?

भारत विरुद्ध श्रीलंका सराव सामना

कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी, भारतीय संघ श्रीलंकन ​​इलेव्हनविरुद्ध तीन दिवसीय सराव सामना खेळणार आहे. श्रीलंकेच्या फिरकीला अनुकूल खेळपट्टी आणि परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी भारतीय खेळाडूंकरिता हा सराव सामना महत्त्वाचा मानला जात आहे. हा सराव सामना आता ७ ते ९ ऑगस्ट दरम्यान खेळला जाईल. मूळतः चार दिवसांचा नियोजित असलेला हा सामना नंतर तीन दिवसांचा करण्यात आला.

सामना किती वाजता सुरू होईल?

भारत आणि श्रीलंका इलेव्हन यांच्यातील सराव सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी १०:०० वाजता सुरू होईल. हा सामना कोलंबो येथील नॉनडेस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब मैदानावर खेळला जाईल. येथील खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना चांगली मदत करते

थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल?

हा सराव सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनल्सवर थेट प्रक्षेपित केला जाईल. भारतीय चाहते येथे विविध भाषांमध्ये थेट सामन्याचा आनंद घेऊ शकतात.

हेड टू हेड रेकॉर्ड

आतापर्यंत भारत आणि श्रीलंका यांच्यात ४६ कसोटी सामने खेळले गेले आहेत. यापैकी टीम इंडियान २२ सामने जिंकले तर श्रीलंकेने फक्त ७ सामने जिंकले आहेत. तसेच, १७ सामने अनिर्णित राहिले. गेल्या १० सामन्यांमध्ये भारताने आठ वेळा विजय मिळवला आहे, तर दोन सामने अनिर्णित राहिले. ९ वर्षानंतर भारतीय संघ पुन्हा एकदा कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला आहे. भारताने श्रीलंकेत शेवटची कसोटी मालिका २०१७ मध्ये खेळली होती. ज्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने ३-० असा विजय मिळवला होता.

भारताचा संघ: शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, केएल राहुल, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, सरांश जैन, मानव सुथार, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, आकीब नबी

क्रिकेटविश्वात खळबळ! सुपर जायंट्समध्ये ‘कॅप्टन्सी ट्विस्ट’, Aiden Markramची अचानक एक्झिट; आता संघाची कमान ‘या’ दिग्गजाकडे

Web Title: Ind vs sl test live streaming when where to watch india vs sri lanka warm up match live on tv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • IND vs SL
  • Shubhman Gill
  • Sri Lanka
  • Test Match

संबंधित बातम्या

SL W vs MAS W: चमारी अटापट्टूचा धमाका! मलेशियाला ८६ धावांनी लोळवलं; श्रीलंकेचे सेमीफायनलचे ‘तिकीट’ पक्के
1

SL W vs MAS W: चमारी अटापट्टूचा धमाका! मलेशियाला ८६ धावांनी लोळवलं; श्रीलंकेचे सेमीफायनलचे ‘तिकीट’ पक्के

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.