फोटो सौजन्य - BCCI Women सोशल मीडिया
महिला T२० विश्वचषक २०२४ : महिला T२० विश्वचषक २०२४ लवकरच सुरु होणार आहे. यासाठी त्याआधी काही संघामध्ये सराव सामने खेळवले जात आहेत. ३ ऑक्टोबरपासून T२० विश्वचषकाला सुरु होणार आहे. याआधी भारताच्या संघाचा वेस्ट इंडिजविरुद्ध सराव सामना पार पडला. यामध्ये भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला २० धावांनी पराभूत केलं आहे. कालच्या सामन्यामध्ये भारतच्या फलंदाजांनी कमालीची कामगिरी केली त्याचबरोबर भारताच्या गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या संघाला १२१ धावांवर रोखले आणि ८ विकेटस घेतले.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने जेमिमाह रॉड्रिग्जच्या अर्धशतकाच्या जोरावर २० षटकांत आठ गडी गमावून १४१ धावा केल्या. प्रत्युत्तरात चिनेल हेन्रीच्या नाबाद ५९ धावांच्या खेळीनंतरही विंडीजचा संघ निर्धारित षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात १२१ धावाच करू शकला. जेमिमानंतर, पूजा वस्त्राकरने भारतासाठी गोलंदाजीत प्रभावित केले, ज्याने चार षटकात २० धावांत तीन बळी घेतले. यादरम्यान त्याने एक मेडन ओव्हरही टाकला. लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली नाही आणि १३ धावांत तीन विकेट गमावल्या. मात्र, चिनले आणि शेरमाने कॅम्पबेल यांनी वेस्ट इंडिजचा डाव काही प्रमाणात आपल्या ताब्यात घेतला. चिनेलेनेही अर्धशतक झळकावले, पण संघाला सामना जिंकून देता आला नाही.
Victory by 20 runs in our first warm-up match 🙌
A fine bowling performance from #TeamIndia restricts West Indies to 121/8 in the 2nd innings 👏👏
Scorecard – https://t.co/IwhrEmFBHg
📸: ICC#T20WorldCup | #WomenInBlue pic.twitter.com/pxFJ1lN9it
— BCCI Women (@BCCIWomen) September 29, 2024