Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs WI T20: वनडेनंतर T20 चा थरार रंगणार! मालिकेआधी आकडेवारीचा खेळ; हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये कोणाचं पारडं जड?

IND vs WI 1st T20I Series Head To Head Record: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना ६ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. आमनेसामनेच्या आकडेवारीमध्ये कोणत्या संघाचे पारडे जड आहे, जाणून घेऊयात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 05, 2026 | 08:02 PM
IND vs WI 1st T20I Series

IND vs WI 1st T20I Series

Follow Us
Follow Us:
  • वनडेनंतर आता टी-२०चा थरार
  • वेस्ट इंडिजविरुद्ध भारताचा रेकॉर्ड किती मजबूत?
  • आकडेवारी काय सांगते?
India vs West indies 1st T20: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यात आली. टीम इंडियाने पहिले दोन सामने जिंकले, तर वेस्ट इंडिजने तिसरा सामना जिंकला. भारताने ही मालिका २-१ ने खिशात घातली. एकीकडे, संपूर्ण मालिकेत फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. तर, दुसरीकडे टीम इंडियाची गोलंदाजी निराशाजनक ठरली. वनडे सीरीजनंतर, आता आता टी२० चा थरार सुरु होणार आहे. दोन्ही संघांमध्ये पाच टी२० सामने खेळले जातील. पहिला सामना ६ ऑक्टोबर रोजी लखनौमध्ये होणार आहे. टी- २० मध्ये या दोन्ही संघाचा हेड टू हेड रेकॉर्ड्स कसा आहे, जाणून घेऊयात.

Bhuvneshwar Kumar चे दमदार कमबॅक! Hong Kong Sixes 2026 मध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणार; ‘या’ स्टार खेळाडूंनाही संधी

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज आमनेसामने रेकॉर्ड

वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाची टी-२० मध्ये कामगिरी चांगली आहे. नुकतेच, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याआधी त्यांनी अफगाणिस्तानला ३-० ने पराभूत केले होते. मायदेशात भारताला हरवणे हे एक खूप कठीण काम असेल. वेस्ट इंडिजला खूप मेहनत करावी लागेल.

दोन्ही संघांमधील पहिला टी२० सामना २००९ मध्ये खेळला गेला. आतापर्यंत भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ३१ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी, भारताने २० सामने जिंकले आहेत, तर वेस्ट इंडिजने १० सामने जिंकले. एक सामना अनिर्णित राहिला. या आकडेवारीवरून भारताचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. दोन्ही संघांमधील शेवटचा सामना २०२६ च्या टी२० विश्वचषकात झाला होता, ज्यात भारताने वेस्ट इंडिजला पाच विकेट्सने पराभूत केले.

उत्कृष्ट खेळाडूच्या नेतृत्वात वेस्ट इंडिज मजबूत

टी२० फॉरमॅटमध्ये, वेस्ट इंडिज संघात रोमारियो शेफर्ड, रोव्हमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर आणि अकील होसेन यांच्यासारखे आक्रमक खेळाडू आहेत, ज्यांना भारतीय परिस्थितीत खेळण्याच्या अनुभवामुळे इंडियन प्रीमियर लीगमध्ये मोठी मागणी आहे. शाई होपच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज एक मजबूत संघ आहे. त्यांची फलंदाजी मोठ्या प्रमाणावर होप, हेटमायर, पॉवेल आणि शेर्फेन रदरफोर्ड यांच्यावर अवलंबून असेल. अष्टपैलू विभागात, वेस्ट इंडिज संघात रॉस्टन चेस, कीमो पॉल, पॉवेल आणि शेफर्ड यांच्यासारखे खेळाडू आहेत.वेस्ट इंडीजच्या गोलंदाजी विभागाचे नेतृत्व डावखुरा फिरकी गोलंदाज अकील होसेन आणि वेगवान गोलंदाज शमर जोसेफ करतील. डावखुरा फिरकी गोलंदाज गुडाकेश मोती आणि चेसच्या ऑफ-ब्रेक गोलंदाजीमुळे संघाला फायदा होईल.

भारतीय संघ फॉर्ममध्ये पण गोलंदाजी विभागाची चिंता

भारताचे सलामीवीर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत, विशेषतः अभिषेकने नुकतेच पाकिस्तानविरुद्ध धमाकेदार अर्धशतक झळकावले आहे. दोघेही संघासाठी आक्रमक फलंदाजी करतात. ईशान किशन आणि तिलक वर्मा हे देखील चांगल्या लयीमध्ये आहेत. भारतीय संघ गोलंदाजी विभागात कोणाला संधी देणार हे पाहणे महत्वाचे ठरेल. कारण, अर्शदीप सिंगसोबत मयंक यादव आणि प्रिन्स यादव यांचा संघात समावेश आहे. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव फिरकी गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील. जर फलंदाजी मजबूत करायची असेल, तर प्रिन्स किंवा मयंकच्या जागी नमन धीरला संधी दिली जाऊ शकते.

IND vs WI: मालिका संपताच भारत-वेस्ट इंडिजला मोठा झटका; दोन्ही संघांना ICC चा दणका; नेमकं कारण काय?

Web Title: Ind vs wi t20i series head to head record schedule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 08:02 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • Record
  • Shreyas Iyer
  • T20 series

संबंधित बातम्या

IND Vs WI: उद्या क्रिकेटचा नव्हे तर पावसाचा खेळ? भारत-वेस्ट इंडिज टी 20 सामना होणार की नाही?
1

IND Vs WI: उद्या क्रिकेटचा नव्हे तर पावसाचा खेळ? भारत-वेस्ट इंडिज टी 20 सामना होणार की नाही?

Badrinath : बद्रीनाथ धामचा नवा विक्रम, 18.67 लाख पेक्षा जास्त भाविकांनी घेतले दर्शन
2

Badrinath : बद्रीनाथ धामचा नवा विक्रम, 18.67 लाख पेक्षा जास्त भाविकांनी घेतले दर्शन

टीम इंडियाचा ‘हा’ जादूगार पुनरागमन करणार? वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाज अपयशी; दिनेश कार्तिक म्हणाला…
3

टीम इंडियाचा ‘हा’ जादूगार पुनरागमन करणार? वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाज अपयशी; दिनेश कार्तिक म्हणाला…

IND vs WI: मालिका संपताच भारत-वेस्ट इंडिजला मोठा झटका; दोन्ही संघांना ICC चा दणका; नेमकं कारण काय?
4

IND vs WI: मालिका संपताच भारत-वेस्ट इंडिजला मोठा झटका; दोन्ही संघांना ICC चा दणका; नेमकं कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.