शुभमन गिल(फोटो-सोशल मीडिया)
Team India playing first Test against West Indies : आशिया कपचे विजतेपद जिंकल्यानंतर भारतीय संघ आता घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या म्हणजेच २ ऑक्टोबरपासून खेळवला जाणार आहे. तथापी, भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतील पहिल्या टेस्टसाठी संघाचा अंतिम इलेव्हन अद्याप निवडण्यात आला नाही.
शुभमन गिलने सांगितले की, गुरुवारी (२ ऑक्टोबर) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू होणाऱ्या सामन्यापूर्वी खेळपट्टीवरील ओलावा आणि परिस्थितीचे मूल्यांकन केल्यानंतरच संघाच्या प्लेइंग इलेव्हनचा निर्णय घेण्यात येईल. गिलने पत्रकार परिषदेत सांगितले की, “आम्ही अद्याप अंतिम अकरा निश्चित केलेला नसून उद्या सकाळी खेळपट्टी पाहून आम्ही निर्णय घेण्यात येईल. जर खेळपट्टी ओली राहिली तर आम्ही तिसऱ्या वेगवान गोलंदाजाचा समावेश करण्याची शक्यता आहे.”
हेही वाचा : ICC T20I Ranking : अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! कोहली आणि सूर्याला मागे टाकत रचला इतिहास
गिल पुढे म्हणाला की, संघाचे ध्येय कठीण आणि मेहनती क्रिकेट खेळणे आहे. गिलने सांगितले की, “गेल्या काही वर्षांत, भारतातील कसोटी सामने पाचव्या दिवसापर्यंत खेळले गेले नाहीत. इंग्लंडमधील अलिकडच्या काळात झालेले सामने रोमांचक राहिले आहेत. आम्हाला सोपा मार्ग स्वीकारायचा नाही. आमच्याकडे सर्व परिस्थितीत आणि सर्व खेळपट्ट्यांवर खेळण्याची क्षमता आहे आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीतून परत येऊ शकतो.”
शुभमन गिल असेही म्हणाला की, भारतीय संघासाठी प्रत्येक मालिका महत्त्वाची आहे, मग ती घरच्या मैदानावर असो किंवा परदेशात खेळली जावो. “आम्ही जवळजवळ एक वर्षानंतर भारतात खेळत असून प्रत्येक मालिका आमच्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे. आम्ही या मालिकेला इतर कोणत्याही मालिकेइतक्याच आत्मविश्वासाने सामोरे जाणार आहोत.”
हेही वाचा : IND W vs SL W :अमनजोत कौरला ११ धावांनी विश्वविक्रमाची हुलकावणी! तरी, एकदिवसीय विश्वचषकात रचला इतिहास…
भारतीय संभाव्य संघ
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), एन जगदीसन, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, प्रसीध कृष्णा, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, देवदत्त नीतीश कुमार रेड्डी,
वेस्ट इंडिज संघ
जॉन कॅम्पबेल, टॅगेनारिन चंदरपॉल, ॲलिक अथानेस, ब्रँडन किंग, रोस्टन चेस (कर्णधार), शाई होप (यष्टीरक्षक), जस्टिन ग्रीव्हज, खारी पियरे, जोहान लायन, अँडरसन फिलिप, जेडेन सील्स, जोमेल वॅरिकन, जेडिडिया ब्लेड्स, केव्हन अँडरसन, टेविन इमले