फोटो सौजन्य - BCCI X अकाउंट
भारत विरुद्ध झिम्बाम्ब्वे : भारताचा संघ आज झिम्बाम्ब्वेविरुद्ध मालिकेतील शेवटचा सामना खेळणार आहे. यामध्ये भारताच्या संघाने ३-१ अशी आघाडी घेऊन मालिका नावावर केली आहे. भारताच्या संघाने शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली या मालिकेमध्ये विजय मिळवला आहे. भारत विरुद्ध झिम्बाम्ब्वे (India vs Zimbabwe) यांच्यामध्ये आज शेवटचा सामना असणार आहे कारण वेळापत्रकानुसार हा पाच सामान्यांची मालिका आयोजित करण्यात आली आहे. आजचा हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ४.३० वाजता सुरु होणार आहे. सामान्याच्या अर्ध्या तासाआधी नाणेफेक होईल. मागील चार सामन्यामध्ये काय निकाल लागला आहे. यावर एकदा नजर टाका
भारत विरुद्ध झिम्बाम्ब्वे सामना ६ जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता. या सामन्यामध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामना झिम्बाम्ब्वेने १३ धावांनी जिंकला होता. या सामन्यांमध्ये झिम्बाम्ब्वेच्या संघाने भारतासमोर ११६ धावांचे लक्ष्य उभे केले होते, परंतु भारताच्या संघाला झिम्बाम्ब्वेने १०२ धावांवर सर्वबाद करून विजय मिळवला.
झिम्बाम्ब्वे विरुद्ध झालेल्या दुसऱ्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने १०० धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यामध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाडने दमदार कामगिरी केली होती. यावेळी भारताच्या संघाने झिम्बाम्ब्वेच्या गोलंदाजांना धुतले होते. भारताच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये भारताने २३४ धावांचे लक्ष्य उभे केले होते. यावेळी भारताच्या गोलंदाजांनी झिम्बाम्ब्वेच्या संघाला १३४ धावांवर ऑलआऊट केले आहे.
मालिकेतील तिसऱ्या सामन्यामध्ये भारताचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यामध्ये T२० विश्वचषकाचा भाग असलेला यशस्वी जैस्वालने संघामध्ये पुरागमन करताच महत्वाची खेळी खेळली. त्याचबरोबर कॅप्टन शुभमन गिलने सुद्धा ६६ धावांची खेळी खेळून संघाला मजबूत स्थितीत उभे केले. भारताच्या संघाने झिम्बाम्ब्वेसमोर १८२ धावांचे लक्ष्य उभे केले होते. त्यानंतर झिम्बाम्ब्वेच्या संघाला १५९ धावांवर सर्वबाद केले आणि विजय मिळवला.
मालिकेतील चौथ्या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये झिम्बाम्ब्वेच्या संघाने भारतासमोर १५२ धावांचे लक्ष्य उभे केले होते. या सामन्यामध्ये भारताच्या संघाने पराक्रम केला आहे. या सामन्यात भारताने एकही विकेट न गमावता लक्ष्य पूर्ण करून विजय मिळवला आहे. भारताच्या संघाने १५६ धावा करत संघाला मालिकेमध्ये विजय मिळवून दिला आहे.