Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND A vs SL A: भारतीय युवा ब्रिगेडचा धमाका! फायनलमध्ये श्रीलंकेला लोळवले; ६६ धावांनी फायनल जिंकत तिरंगी मालिकेचे विजेतेपद पटकावले

'इंडिया अ' संघाने अंतिम सामन्यात 'श्रीलंका अ' संघाचा धुव्वा उडवला. या शानदार विजयासह भारताने तिरंगी मालिकेचे विजेतेपद पटकावले. या सामन्यातील सर्वात प्रभावी खेळाडू ठरला तो १५ वर्षांचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी; त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजीचा समाचार घेत केवळ २९ चेंडूत ९४ धावांची अविश्वसनीय खेळी साकारली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 21, 2026 | 06:25 PM
भारतीय युवा ब्रिगेडचा धमाका! फायनलमध्ये श्रीलंकेला लोळवले (Photo Credit- X)

भारतीय युवा ब्रिगेडचा धमाका! फायनलमध्ये श्रीलंकेला लोळवले (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • भारतीय युवा ब्रिगेडचा धमाका!
  • फायनलमध्ये श्रीलंकेला लोळवले
  • ६६ धावांनी फायनल जिंकत तिरंगी मालिकेचे विजेतेपद पटकावले
IND A vs SL A Highlights: बेबी बाॅस स्टार वैभव सूर्यवंशीची (Vaibhav Sooryavanshi) वादळी खेळी आणि गोलंदाजांची दमदार कामगिरी यांच्या जोरावर, ‘इंडिया अ’ संघाने अंतिम सामन्यात ‘श्रीलंका अ’ संघाचा धुव्वा उडवला. या शानदार विजयासह भारताने तिरंगी मालिकेचे विजेतेपद पटकावले. या सामन्यातील सर्वात प्रभावी खेळाडू ठरला तो १५ वर्षांचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी; त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजीचा समाचार घेत केवळ २९ चेंडूत ९४ धावांची अविश्वसनीय खेळी साकारली. त्याच्या या स्फोटक फलंदाजीच्या बळावर, भारताने एकतर्फी ठरलेल्या सामन्यात श्रीलंकेचा ६६ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.

वैभव आणि प्रभसिमरन यांचा कहर

विजेतेपदाच्या या लढतीत, ‘श्रीलंका अ’च्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु भारतीय सलामीवीरांनी तो निर्णय पूर्णपणे चुकीचा असल्याचे सिद्ध केले. मैदानात उतरताच वैभव सूर्यवंशी आणि प्रभसिमरन सिंग या भारतीय सलामीच्या जोडीने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. स्फोटक फलंदाजी करत त्यांनी केवळ ५३ चेंडूत १३२ धावांची विक्रमी सलामीची भागीदारी रचली.

🚨 INDIA A TRIUMPH! Tilak Varma & Co. beat Sri Lanka A by 66 runs to clinch the tri-series 🏆#INDAvsSLA pic.twitter.com/wXi4fzuWBD — Cricbuzz (@cricbuzz) June 21, 2026

Ind A vs Sl A Final: Vaibhav Sooryavanshi ची वादळी खेळी! श्रीलंकेच्या गोलंदाजांना धू-धू धुतले; 20 वर्षांचा विश्वविक्रम मोडला

या दरम्यान, वैभवने ‘लिस्ट-ए’ (List-A) क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक केवळ ११ चेंडूत पूर्ण केले आणि पुढे जाऊन एकूण ९४ धावांची खेळी केली. सलामीवीरांनी दिलेल्या या स्वप्नवत सुरुवातीमुळे, ‘इंडिया अ’ संघाने निर्धारित ५० षटकांत ९ बाद ३७७ धावांचा प्रचंड डोंगर उभारला.

३७८ धावांच्या डोंगराएवढ्या आव्हानासमोर श्रीलंकेचा संघ कोलमडला

प्रत्युत्तरात, ३७८ धावांचे कठीण आव्हान पेलताना ‘श्रीलंका अ’ संघाला प्रचंड दबावाचा सामना करावा लागला. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच सामन्यावर आपली पकड घट्ट ठेवली आणि नियमित अंतराने बळी टिपले. भारतीय गोलंदाजांच्या घातक माऱ्यासमोर श्रीलंकेचा संघ पूर्णपणे कोलमडला आणि विजयाच्या लक्ष्यापासून खूप दूर राहिला; ‘इंडिया ए’ने त्यांना ३११ धावांत सर्वबाद केले.

IND vs ENG ODI Series: इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, Virat Kohli चे कमबॅक; शतकवीर खेळाडू संघाबाहेर

Web Title: India a beats sri lanka a by 66 runs to win tri series final

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 06:25 PM

Topics:  

  • IND A vs SL A
  • Sports News
  • Team India
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

Sports News: धावपटूंचा जोश, जिंकण्याची जिद्द! पुणे विद्यापीठाची क्रॉस-कंट्री स्पर्धा उत्साहात
1

Sports News: धावपटूंचा जोश, जिंकण्याची जिद्द! पुणे विद्यापीठाची क्रॉस-कंट्री स्पर्धा उत्साहात

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
2

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले
3

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
4

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.