एसएएफएफ अंडर-१९ चॅम्पियनशिप(फोटो-सोशल मीडिया)
SAFF U-19 Championship : भारतीय अंडर-१९ फुटबॉल संघाने शानदार कामगिरी करत एसएएफएफ अंडर-१९ चॅम्पियनशिपमध्ये बांगलादेशला पराभूत करून जेतेपद आपल्या नावे केले आहे. भारतीय संघाने पेनल्टी शूटआउटमध्ये ४-३ असा दणदणीत विजय मिळवला आणि विजेतेपद राखले आहे. नियमित वेळेनंतर सामना १-१ असा बरोबरीत राहिल्यामुळे निकालासाठी पेनल्टी शूटआउटची आवश्यकता होती.
एसएएफएफ अंडर-१९ चा अंतिम सामना खूपच रोमांचक असा झाला. अरुणाचल प्रदेशमध्ये खेळवण्यात आलेल्या या अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार सिग्मायम शमीने दुसऱ्याच मिनिटाला गोल करून केली.
पेनल्टी शूटआउटची सुरुवात भारतासाठी चांगली राहिली नाही. तथापि, बिबियानो फर्नांडिसच्या संघाने हार मानली नाही. त्यानंतर, बांगलादेशकडून कर्णधार नझमुल हुदा फैसलचा गोल यशस्वी झाला नाही आणि तो भारताच्या बाजूने गेला. तेव्हापासून भारताने आपले स्थान बळकट केले.
Congratulations!! 🎉
Captain Singamayum Shami from Manipur nailed the thriller with an ice-cold penalty kick !!
Manipuri players made a huge contribution in this tournament.
🔥 7 players in starting XI hails from Manipur.#BrandManipur #SaffU19#Footballpic.twitter.com/CHlwlAGG9A— Kanglei Chronicle (@Tongjei_Maril) May 18, 2025
भारतीय संघाने उर्वरित पेनल्टी यशस्वीरित्या गोलमध्ये रूपांतरित करण्यात यश मिळवले. गोलकीपर सूरज सिंगने महत्त्वाच्या क्षणी उत्कृष्ट कामगिरी केली. शांत, संयमी कर्णधार संगम्युम शमीने शेवटच्या पेनल्टीवर गोल करून भारताला पुन्हा एकदा विजेतेपद मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. एका तणावपूर्ण आणि चुरशीच्या स्पर्धेत भारताचा शेवट अतिशय गोड झाला.
भारताकडून पेनल्टी शूटआउटमध्ये एमडी अरबाश, जोड्रिक अब्रांच, ऋषी सिंग आणि संगमयुम शमी यांनी ४ गोल केले. बांगलादेशकडून एमडी मिठू चौधरी, एमडी मुर्शिद अली आणि एमडी जॉय अहमद यांनी पेनल्टीवर गोल डागले. बांगलादेश संघ केवळ तीन गोलच करू शकला.
हेही वाचा : RR vs CSK : तळाचे संघ आज आमनेसामने! चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये होणार प्रतिष्ठेची लढाई
सर्वाधिक गोल करणारा खेळाडू: डॅनी मीतेई लैशराम (५ गोल), भारत
सर्वोत्तम गोलकीपर: सूरज सिंग अहिबाम, भारत
सर्वात मौल्यवान खेळाडू: एमडी अरबाश, भारत
फेअर प्ले पुरस्कार: भारत
एकना मैदानावर काल सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यामध्ये हा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात लखनऊच्या संघाला सनरायझर्स हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना २०५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात सामन्यात हैदराबादच्या संघाने १९ व्या ओव्हरमध्ये लक्ष पूर्ण करून विजय मिळवला.