Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जयवर्धनेला मागे टाकत कोहलीचा ‘विराट’ विक्रम! भारताचे बांग्लादेशपुढे १८५ धावांचे आव्हान

के एल राहुल बाद झाल्यानंतर फलंदाजीस सूर्यकुमार यादव आला. सूर्यकुमारने छोटीशी खेळी करत १६ चेंडूत ३० धावांचे खेळी केली. यात त्याने ४ चौकार मारले. तर हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक व अक्षर पटेल झटपट बाद झाले. अश्विनेने ६ चेंडूत १३ धावा काढत कोहलीला चांगली साथ दिली. भारताने बांग्लादेशसमोर विजयासाठी १८५ धावांचे आव्हान दिले आहे. बांग्लादेशकडून हसन मोहम्मद याने तीन विकेट घेतले तर, शाकिब हसन याने दोन विकेट घेतल्या.

  • By Amrut Sutar
Updated On: Nov 02, 2022 | 03:24 PM
जयवर्धनेला मागे टाकत कोहलीचा ‘विराट’ विक्रम! भारताचे बांग्लादेशपुढे १८५ धावांचे आव्हान
Follow Us
Follow Us:

एडिलेड : टी-२० वर्ल्डकपमधील (T-20 world cup) आज भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) यांच्यात सामना होत आहे. भारताचा टी-२० वर्ल्डकपमधील आजचा चौथा सामना आहे. मागील दोन सामने भारताने जिंकले आहेत, तर तिसऱ्या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पाच विकेटसनी पराभवाचा सामना करावा लागला. भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) सामन्यात बांग्लादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. याआधी भारताने पाकिस्तान आणि नेदरलँड संघावर विजय मिळवले आहेत. तर बांग्लादेशनेही दोन विजय मिळवले आहेत. दोन्ही संघांना प्रत्येकी एक सामना गमवावा लागला आहे. ज्यानंतर दोघेही आपला सुपर १२ मधील चौथा सामना आज खेळणार आहेत.

[read_also content=”माजी उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत https://www.navarashtra.com/india/video-call-from-naked-young-woman-to-bjp-mla-filed-a-complaint-with-the-police-nrrd-341182.html”]

कोहलीचा ‘विराट’ विक्रम…

दरम्यान, भारताची सलामीची जोडी पुन्हा एकदा अपयशी ठरली. तीन सामन्यात अपयशी ठरलेला के एल राहुलला या सामन्यात फॉर्म गवसला. राहुलने या सामन्यात ३२ चेंडूत २० धावा केल्या. यात त्याने तीन चौकार व चार शानदार षटकार ठोकले. तर दुसरीकडे कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) फक्त दोन धावांवर बाद झाला. तिसऱ्या क्रंमाकावर आलेल्या विराट कोहलीने विक्रम केला. कोहलीच्या पहिल्या ३ सामन्यांमध्ये एकूण १५६6 धावा केल्या आहेत. आजच्या सामन्यात किंग कोहली (Virat Kohli) धुवांधार अर्थशतकी खेळी खेळली. फक्त ३८ चेंडूत कोहलीने ५० धावा केल्या. तसेच कोहलीच्या आजच्या खेळीच्या जोरावर विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने याच्या नावावर आहे. हा विक्रम किंग कोहलीने मोडला आहे. विराट कोहलीने जयवर्धनेच्या १०१६ धावांचा आकडा पार केला आहे. कोहलीने ४४ चेंडूत ६४ धावांची शानदार खेळी केली.

भारताचे १८५ धावांचे आव्हान

के एल राहुल बाद झाल्यानंतर फलंदाजीस सूर्यकुमार यादव आला. सूर्यकुमारने छोटीशी खेळी करत १६ चेंडूत ३० धावांचे खेळी केली. यात त्याने ४ चौकार मारले. तर हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक व अक्षर पटेल झटपट बाद झाले. अश्विनेने ६ चेंडूत १३ धावा काढत कोहलीला चांगली साथ दिली. भारताने बांग्लादेशसमोर विजयासाठी १८५ धावांचे आव्हान दिले आहे. बांग्लादेशकडून हसन मोहम्मद याने तीन विकेट घेतले तर, शाकिब हसन याने दोन विकेट घेतल्या. दरम्यान, आज जिंकणारा संघच सेमीफायनलच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकणार असून दुसऱ्या संघाचा प्रवास अत्यंत खडतर होईल. आज विजय मिळवणारा संघ ६ गुणांसह अव्वल स्थानी पोहोचणार आहे. झिम्बाब्वे ( ३), पाकिस्तान ( २) व नेदरलँड्स ( २) हे गुणतालिकेत शर्यतीत आहेत, परंतु त्यांची शक्यता फार कमीच आहे.  ग्रुप २ मध्ये दक्षिण आफ्रिका ५ गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर भारत  व बांगलादेश यांच्या खात्यात प्रत्येकी ४ गुण आहे. दोन्ही संघासाठी आजचा सामना ‘करो या मरो’ असा आहे.

Web Title: India challenge of one hundred eight five runs against bangladesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2022 | 03:24 PM

Topics:  

  • Australia
  • Bangladesh
  • india
  • T-20 World Cup
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

मराठी उद्योजकतेची ग्लोबल भरारी! Krystal Integrated Services चा ऐतिहासिक करार; स्मार्ट सिटी अन् EV क्षेत्रात घडणार क्रांती
1

मराठी उद्योजकतेची ग्लोबल भरारी! Krystal Integrated Services चा ऐतिहासिक करार; स्मार्ट सिटी अन् EV क्षेत्रात घडणार क्रांती

Rohingya Crisis: म्यानमार सरकारची मोठी घोषणा; बांगलादेशातून 3 लाखांहून अधिक रोहिंग्या मुस्लिमांची स्वदेशी वापसी होणार
2

Rohingya Crisis: म्यानमार सरकारची मोठी घोषणा; बांगलादेशातून 3 लाखांहून अधिक रोहिंग्या मुस्लिमांची स्वदेशी वापसी होणार

Study in Australia: १२ वी नंतर ऑस्ट्रेलियात हवी आहे त्वरित नोकरी? ‘हा’ शॉर्ट टर्म कोर्स ठरू शकतो गेमचेंजर!
3

Study in Australia: १२ वी नंतर ऑस्ट्रेलियात हवी आहे त्वरित नोकरी? ‘हा’ शॉर्ट टर्म कोर्स ठरू शकतो गेमचेंजर!

India caste census: जात मोजणार, पण नेमकी कशी? जनगणना २०२७ मधील जातनिहाय आकडेवारीवरून का वाद?
4

India caste census: जात मोजणार, पण नेमकी कशी? जनगणना २०२७ मधील जातनिहाय आकडेवारीवरून का वाद?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.