
photo- social media
या पराभवाचा परिणाम केवळ सामना किंवा मालिकेपुरता मर्यादित नव्हता. आयर्लंडविरुद्ध ०-२ आणि इंग्लंडविरुद्ध ०-४ ने पराभूत झाल्यानंतर भारताने आयसीसी टी२० क्रमवारीत अव्वल स्थान गमावले.भारतीय संघ फेब्रुवारी २०२२ मध्ये टी-२० मधील अव्वल संघ बनला. सुमारे १६०० दिवस जगातील अव्वल टी२० संघ होता, पण आता इंग्लंडने हे स्थान पटकावले आहे. इंग्लिश संघाने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर केवळ मालिकेत दणदणीत विजयच मिळवला नाही, तर टी२० क्रिकेटमधील नवीन अव्वल संघ बनण्याचा मानही पटाकावला.
साउथहॅम्प्टन येथील द रोझ बाऊलमध्ये प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने तीन विकेट्स गमावून २५७ धावांचा डोंगर उभा केला. सुरुवातीला, फिल सॉल्ट केवळ सहा धावा करून प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर बाद झाला, पण त्यानंतर जोस बटलर आणि हॅरी ब्रूक यांनी भारतीय गोलंदाजांना कमबॅक करण्याची कोणतीही संधी दिली नाही. या दोन फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी १०२ चेंडूंमध्ये २३३ धावांची विक्रमी भागीदारी केली, जी टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये इंग्लंडसाठी कोणत्याही विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी आहे. बटलरने ६४ चेंडूंमध्ये १२ चौकार आणि आठ षटकारांसह १३१ धावा ठोकल्या. दरम्यान, हॅरी ब्रुकने ४५ चेंडूंमध्ये चार चौकार आणि आठ षटकारांसह नाबाद ९५ धावा केल्या.
२५८ धावाचा पाठलाग करताना भारतीय संघ आठ विकेट्स गमावून केवळ २०१ धावाच करू शकला. सलामीवीर अभिषेक शर्मा सलग तिसऱ्या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आणि केवळ तीन धावा करून बाद झाला. संजू सॅमसनने १४ चेंडूंमध्ये २७ धावा करत वेगवान सुरुवात केली, पण त्याला आपला डाव पुढे वाढवता आला नाही. ईशान किशनने ३५ चेंडूंमध्ये ५६ धावांचे अर्धशतक झळकावून पुनरागमन केले. कर्णधार श्रेयस अय्यरने १६ चेंडूंमध्ये २८ धावा केल्या, तर तिलक वर्माने २५ चेंडूंमध्ये ५३ धावांची वेगवान खेळी केली. मात्र, शिवम दुबेने १४, सूर्यांश शेडगे ७ आणि अक्षर पटेल ३ धावा करत संघाला लक्ष्याच्या जवळ पोहोचवण्यात अपयशी ठरले. तर, अर्शदीप सिंग चार धावांवर नाबाद राहिला.
टीम इंडियात मोठी उलथापालथ? सलग पराभवानंतर प्रशिक्षक देणार राजीनामा? BCCI मोठी कारवाई करणार