पोटो सौजन्य: Instagram
आशिया कप हा नेहमीच भारताच्या नावावर राहिलेला आहे. महिला आशिया कपच्या एकूण 9 सीझनपैकी 7 सीझनवर भारताचे नाव आहे तर बांगलादेशने 2018 साली हा कप जिंकला होता. २०२२ च्या महिला आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला हरवले होते. तर या 9 व्या सीझनमध्ये श्रीलंकेने भारताला हरवून आपला बदला पूर्ण केला आहे.
९ सीझनपैकी दुसऱ्यांदा फायनल हरली भारतीय टीम
महिला आशिया चषक स्पर्धेच्या मागील 8 सीझनपैकी, बांगलादेशने 2018 चा सीझन फक्त एकदाच जिंकला होता. तर दुसरीकडे भारत 7 वेळा अजिंक्य राहिला होता. पण हा 9वा सीझन श्रीलंकेच्या संघाने जिंकला आहे. यासर्वात पाकिस्तान टीम अजून एकदाही महिला आशिया कप जिंकू शकलेला नाही.
श्रीलंकेने 18.4 मध्ये सामना आणि कप जिंकला
या अंतिम सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 166 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य श्रीलंकेच्या संघाने अवघ्या 18.4 षटकांत 2 गडी गमावून पूर्ण केले. हर्षिता समरविक्रमाने संघाकडून सर्वाधिक नाबाद ६९ धावांची खेळी केली तर कर्णधार चमीरा अटापट्टूने 61 धावा केल्या. यावेळी भारताचा एकही गोलंदाज आपली छाप सोडू शकला नाही. केवळ दीप्ती शर्माला एक विकेट घेता आली. तिने कॅप्टन चमीराला बाद केले.
𝗖𝗛𝗔𝗠𝗣𝗜𝗢𝗡𝗦 🇱🇰🏆#WomensAsiaCup2024 #ACC #HerStory #SLWvINDW #GrandFinale pic.twitter.com/4knbEkIz5H
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) July 28, 2024
भारताकडून स्मृती मानधनाची दमदार अर्धशतकी खेळी
भारतीय संघाने 6 गडी गमावून 165 धावा केल्या. संघाकडून सलामीवीर स्मृती मानधनाने 47 चेंडूत 60 धावांची खेळी केली. याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज रिचा घोषने 30 आणि जेमिमाह रॉड्रिग्जने 29 धावा केल्या. श्रीलंकेकडून गोलंदाजीत कविशाने सर्वाधिक २ विकेट्स घेतले.