फोटो सौजन्य - सोशल मीडिया
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताच्या ॲथलेटिक्सने कमाल करून दाखवली. यंदा भारताचे ११७ खेळाडू पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी पात्र ठरले होते. यामध्ये भारताने ६ पदकांची कमाई केली आहे. यामध्ये ५ कास्यपदकांचा समावेश आहे तर एक सिल्वर मेडलचा समावेश आहे. बऱ्याच जणांना ठाऊक नाही की, ऑलिम्पिकचे सत्र संपल्यानंतर काही दिवसांनी पॅरालिम्पिक सुरु होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, पॅरालिम्पिक म्हणजे काय? तर पॅरालिम्पिक खेळ किंवा पॅरालिम्पिक ही विविध अपंग खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय बहु-क्रीडा स्पर्धा असते यामध्ये अनेक वेगवेगळे खेळ खेळले जातात. यामध्ये आता भारताचे किती पॅरा खेळाडू सहभागी होणार? या स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर माहिती या लेखामध्ये देण्यात आली आहे.
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारताचे एकूण ६९ खेळाडू सहभागी होणार आहेत. यामध्ये आर्चरीमध्ये ६ खेळाडू, ॲथलेटिक्स २१, बॅडमिंटनमध्ये १२, सायकलिंग २, जुडो २, पॅराकॅनोइंग ४, पॉवरलिफ्टिंग ४, रोईंग २, शूटिंग ११, स्विमिंग २, टेबल टेनिस २ आणि तायक्वांदो १ असे खेळाडू पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ सहभागी होणार आहेत.
View this post on Instagram
A post shared by Paralympic Committee of India (@paralympicsindia_official)
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ ची स्पर्धा २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत ही स्पर्धा सुरु असणार आहे. ११ दिवस या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ २८ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रीमिंग JIO Cinema वर थेट प्रक्षेपण दाखवले जाणार आहे. त्याचबरोबर तुम्ही पॅरालिम्पिक युट्युब चॅनेलवर सुद्धा या स्पर्धेचे सामने पाहू शकतात. त्याचबरोबर टेलिव्हिजनवर पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी बीबीसी चॅनेलवर हे खेळ दाखवले जाणार आहेत.