Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AFG: IPL चा फ्लॉप शो टेस्ट क्रिकेटमध्येही चालू, Yashasvi Jaiswal पुन्हा अपयशी

अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यातही भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वालचा खराब फॉर्म कायम राहिला, तो सलीम साफीच्या गोलंदाजीवर अवघ्या २४ धावांवर बाद झाला आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 06, 2026 | 12:54 PM
यशस्वी जैस्वाल पुन्हा एकदा अपयशी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

यशस्वी जैस्वाल पुन्हा एकदा अपयशी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • यशस्वी जैस्वाल कसोटी क्रिकेटमध्येही पहिल्या डावात लगेच झाला बाद 
  • केवळ २४ धावा काढल्या 
  • आयपीएलनंतरही यशस्वीचा फॉर्म खराब 
मुल्लानपूरः भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर फलंदाज, यशस्वी जैस्वाल, याचा खराब फॉर्म त्याला अजूनही सतावत आहे. क्रिकेट चाहत्यांना आशा होती की मुल्लानपूर येथे अफगाणिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक एकमेव कसोटी सामन्यात जैस्वाल आपला फॉर्म परत मिळवेल, पण तो पुन्हा एकदा खेळपट्टीवर झगडला आणि अगदीच स्वस्तात बाद झाला. त्याच्या फलंदाजीची कामगिरी बऱ्याच काळापासून सातत्याने खालावत आहे, ज्यामुळे भारतीय संघ आणि त्याचे चाहते या दोघांसाठीही गंभीर चिंतेचे कारण बनले आहे.

IND vs AFG: ड्रामा, जीवनदान अन्… ! अफगाणिस्तानला ‘ती’ चूक नडली; KL Rahul ने ठोकले अर्धशतक

अफगाणिस्तानविरुद्ध लेग-स्टंपवर झाला बाद 

सामन्याच्या पहिल्या दिवशी चांगली सुरुवात करूनही, यशस्वीला आपल्या खेळीचे मोठ्या खेळीत रूपांतर करता आले नाही. तो अफगाण गोलंदाज सलीम साफीच्या गोलंदाजीवर साफ अडकला आणि बाद झाला. साफीच्या षटकातील चौथ्या चेंडूवर, लेग-स्टंपच्या दिशेने येत असताना जैस्वालने एक विचित्र फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि यष्टीरक्षकाने त्याचा झेल घेतला. सलीम साफीने १३२.९ किमी प्रतितास वेगाने शॉर्ट-ऑफ-लेंथ चेंडू टाकला, जो जैस्वालने फाइन लेगच्या दिशेने फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या बॅटच्या आतल्या कडेला लागून थेट अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक आसिफ झझाईच्या ग्लोव्हजमध्ये गेला आणि यशस्वी जैस्वाल ३२ चेंडूंमध्ये ५ चौकारांच्या मदतीने केवळ २४ धावा करून बाद झाला.

आयपीएल २०२६ मध्येही निराशाजनक कामगिरी

जैस्वालचा खराब फॉर्म केवळ या कसोटी सामन्यापुरता मर्यादित नाही; नुकत्याच संपलेल्या आयपीएल २०२६ मध्येही त्याची बॅट अजिबातच चालली नाही आणि त्याने धावांचा पाऊसही पाडला नाही. तसंच वैभव सूर्यवंशीच्या खेळामुळे त्याचा संपूर्ण खेळही झाकोळून गेला. संपूर्ण हंगामात त्याला प्रत्येक धावेसाठी संघर्ष करावा लागला आणि एकही मोठी किंवा सामना जिंकून देणारी खेळी तो करू शकला नाही. 

या हंगामात तो सर्व १६ सामन्यांमध्ये खेळला, ज्यात त्याने ३०.५० च्या सरासरीने त्याने ४२७ धावा केल्या, त्याची सर्वोच्च धावसंख्या ५१ होती, आणि संपूर्ण स्पर्धेत त्याला केवळ तीन अर्धशतकेच करता आली. एक आक्रमक सलामीवीर म्हणून नावलौकिक मिळवलेल्या जैस्वालचा खराब फॉर्म स्पष्टपणे दिसून येत आहे आणि त्यामुळे चाहत्यांना त्याच्या फॉर्मबाबत अधिक चिंता सतावते आहे. 

ENG vs NZ: इंग्लंडने रचला इतिहास! जो रूटने केले कसोटी क्रिकेटमधील ‘तिहेरी शतक’ पूर्ण, ठरला जगातील दुसरा खेळाडू

भारतीय संघासाठी वाढती चिंता

बदलाच्या प्रक्रियेतून जात असलेल्या नव्या भारतीय संघात, कर्णधार शुभमन गिलसोबत संघाला एक दमदार आणि आक्रमक सुरुवात करून देण्याची मोठी जबाबदारी यशस्वी जयस्वालवर होती. मात्र, त्याची दीर्घकाळ चाललेली सुमार कामगिरी आता संघ व्यवस्थापनासाठी डोकेदुखी बनत आहे. पुढे येणाऱ्या प्रदीर्घ कसोटी हंगामाच्या पार्श्वभूमीवर, जयस्वालला ही कमकुवत बाजू दूर करून लवकरात लवकर धावा करण्याचे सूत्र शोधावे लागेल. तसंच आपल्या या खराब कामगिरीवरही त्याला काही ना काही उपाय शोधून काढावा लागणार आहे. पहिल्या डावात खराब सुरूवात करून दिल्यानंतर किमान दुसऱ्या डावाकडे सकारात्मकरित्या यशस्वीने लक्ष केंद्रित करावे आणि खेळावे अशीच चाहत्यांची इच्छा आहे. 

Web Title: India vs afghanistan test cricket yashasvi jaiswal bad form continues after ipl also got out after 24 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 12:54 PM

Topics:  

  • IND vs AFG
  • Test cricket
  • Yashasvi Jaiswal

संबंधित बातम्या

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी
1

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी

मोठी खळबळ! Team India ला मोठा धक्का? अफगाणिस्तान सिरीजआधी  Hardik Pandya ला दुखापत
2

मोठी खळबळ! Team India ला मोठा धक्का? अफगाणिस्तान सिरीजआधी Hardik Pandya ला दुखापत

Tilak Verma: संकटमोचक परतला! दुलीप ट्रॉफीत ठोकले खणखणीत शतक; AFG विरुद्ध संधी मिळणार?
3

Tilak Verma: संकटमोचक परतला! दुलीप ट्रॉफीत ठोकले खणखणीत शतक; AFG विरुद्ध संधी मिळणार?

राडा घातला, भयानक खेळी केली! मात्र Abhishek Sharma च्या संघाला यश नाहीच; Sher A Punjab लीगमध्ये…
4

राडा घातला, भयानक खेळी केली! मात्र Abhishek Sharma च्या संघाला यश नाहीच; Sher A Punjab लीगमध्ये…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.