केएल राहुलचे शानदार अर्धशतक (फोटो- ट्विटर)
कर्णधार शुभमन गिलचा प्रथम फलंदाजीचा निर्णय
न्यू चंदीगडमध्ये सुरू आहे भारत अफगणिस्तान कसोटी
यशस्वी जयस्वाल पुन्हा ठरला अपयशी
KL Rahul Vs AFG Bowlers: न्यू चंदीगडमधील मुल्लानपूर येथील स्टेडियमवर भारत विरुद्ध अफगणिस्तान हा एकमेव कसोटी सामना सुरू झाला आहे. कर्णधार शुभमन गिलने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी भारताच्या दवाची सुरुवात केली. मात्र या सामन्यात अफगणिस्तानची एक मोठी चूक झाली आणि केएल राहुलला जीवदान मिळाले. त्यानंतर राहुलने शानदार अर्धशतक लगावले आहे. नेमके हे प्रकरण काय आहे ते जाजून घेऊयात.
केएल राहुलसोबत नेमके घडले काय?
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी मैदानावर एक मोठा हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. 11 व्या ओव्हर्समधील गोष्ट आहे. अफगाणिस्तानचा गोलंदाज जियाउर रहमान शारीफी हा ओव्हर टाकण्यासाठी आला. त्याच्या एका बॉलवर केएल राहुलने बॅकफुटला जाऊन कट शॉट मरण्याचा प्रयत्न केला. मात्र बॉल बारीकसा बॅटला लागून विकेट किपरकडे गेला.
India opener KL Rahul remained unmoved after clearly edging a ball to wicketkeeper on Day 1 of the Mullanpur Test, prompting Afghanistan captain Hasmatullah Shahidi to decide against the DRS.#AFGvINDhttps://t.co/HEwE8I1IIu — Circle of Cricket (@circleofcricket) June 6, 2026
त्यानंतर जियाउर रहमान शारीफी आणि अन्य खेळाडूंनी जोरदार अपील केले. मात्र ऑन-फील्ड अंपायरने राहुलला ‘नॉट-आऊट’ घोषित केले. स्लिपमध्ये उभा असलेला रहमानुल्लाह गुरबाज पूर्णपणे ठाम होता की चेंडू बॅटला लागला आहे. त्याने कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीला डीआरएस घेण्यासाठी सांगितले. मात्र विकेट किपरने आवाज न आल्याचे सांगितल्यामुळे डीआरएस घेतला नाही आणि इथेच मोठी चूक झाली. खरे तर नन्यत्र जेव्हा त्याचा रिप्ले पाहण्यात आला तेव्हा केएल राहुल आउट असल्याचे दिसून येत होते.
💯 up for #TeamIndia! 💪 KL Rahul & Sai Sudharsan putting up a solid show in the middle. 👍 Updates ▶️ https://t.co/Au50EfVM30#INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/lz4Kvd6S2l — BCCI (@BCCI) June 6, 2026
केएल राहुलची शानदार ॲक्टिंग
अंपायरने नॉट-आऊट दिल्यानंतर आणि अफगाणिस्तानचा संघ रिव्ह्यूबाबत चर्चा करत असताना, केएल राहुलने मैदानावर बॉल लागलाच नाही असे दाखवले. राहुलच्या या शांत राहण्यामुळे अफगाणिस्तानच्या कर्णधाराचा संभ्रम आणखी वाढला आणि त्यांनी रिव्ह्यू घेण्याचे टाळले.






