फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध बांग्लादेश – चॅम्पियन ट्रॉफी २०२५ : भारताचा संघ आज बांग्लादेशविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. बांग्लादेश विरुद्ध भारत यांच्यामध्ये होणाऱ्या पहिल्या चॅम्पियन ट्रॉफीचा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगणार आहे. दोन्ही संघ या आयसीसी स्पर्धेची सुरुवात विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरतील. भारताचा संघाने इंग्लंडविरुद्ध झालेल्या तीन सामान्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये कमालीची कामगिरी करून टीम इंडियाने इंग्लंडला ३-० मालिकेमध्ये पराभूत केले आहे. आता भारताचा संघ या स्पर्धेमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आयसीसी स्पर्धा खेळणार आहे. तर टीम इंडियाचे उपकर्णधारपद शुभमन गिलकडे सोपवण्यात आले आहे
जेव्हा बीसीसीआयने चॅम्पियन ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा केली होती. त्यावेळी भारताच्या संघाचे उपकर्णधारपद अनुभवी खेळाडूंना न देता शुभमन गिलकडे जेव्हा सोपवण्यात आले तेव्हा सर्वानाच धक्का बसला होता. याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते पण सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने संघावर उपस्थित होणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत आणि गिलला संघाचा उपकर्णधार का बनवण्यात आले आहे हे देखील उघड केले आहे.
शुभमन गिलला उपकर्णधार बनवण्याबाबत रोहित शर्मा म्हणाला की, “गिल हा एक उत्तम खेळाडू आहे आणि त्याचे आकडे आश्चर्यकारक आहेत. त्याला संघाचा उपकर्णधार करण्यामागे एक कारण आहे.” शुभमन गिल कदाचित कसोटी आणि टी-२० मध्ये टीम इंडियासाठी कामगिरी करू शकणार नाही पण तो सध्याच्या एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानला जातो. शुभमन गिलची एकदिवसीय क्रिकेटमधील आकडेवारी उत्कृष्ट आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही त्याची बॅट जोरात गर्जना करत होती. त्याने तीन सामन्यांमध्ये २ अर्धशतके आणि एक शतक झळकावून आपली तयारी मजबूत केली. यासह, गिलने मालिकेत सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३ सामन्यात २५९ धावा केल्या होत्या.
शुभमन गिल हा एकदिवसीय सामन्यांमध्ये ६० पेक्षा जास्त सरासरीने धावा करणाऱ्या काही फलंदाजांपैकी एक आहे. आतापर्यंत त्याने भारतासाठी ५० डावांमध्ये २५८७ धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तो एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद २५०० धावा करणारा फलंदाजही ठरला. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तो टीम इंडियासाठी एक महत्त्वाचा दुवा ठरेल. भारताच्या संघाचे सर्व सामने सुरक्षेच्या कारणांमुळे युएई मध्ये खेळणार आहे. उर्वरित सर्व संघाचे सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जाणार आहेत.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर , लोकेश राहुल (विकेटकिपर), ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.
नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), सौम्य सरकार, तन्जीद हसन, तौहिद हृदया, मशफिकुर रहीम, मोहम्मद महमुदुल्लाह, झाकीर अली अनिक, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, परवेझ हुसेन इमोन, नसुम अहमद, तन्झीम हसन साकिब आणि नाहिद राणा.