चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान (फोटो- ट्विटर)
Champions Trophy 2025: आजपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात झाली आहे. आज न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात पहिला सामना पार पडला. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील हा पहिला सामना कराची स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 60 धावांनी दणदणीत पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 320 धावा केल्या. पाकिस्तानला 321 धावांचे लक्ष्य दिले. मात्र पाकिस्तान केवळ 260 धावाच करू शकला.
Clinical New Zealand down Pakistan in #ChampionsTrophy 2025 opener 👏#PAKvNZ 📝: https://t.co/E5MS83KLLA pic.twitter.com/JpcqY5664Q
— ICC (@ICC) February 19, 2025
पाकिस्तानचा पहिल्याच सामन्यात पराभव झाला आहे. त्यामुळे या स्पर्धेत टिकून राहायचे असल्यास पुढील सर्व सामने त्यांना जिंकावे लागणार आहेत. मात्र पुढील त्यांचा सामना हा भारताशी होणार आहे. त्यामुळे पाकिस्तानसमोर मोठे आव्हान असणार आहे.
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 320 धावा केल्या. तर पाकिस्तान या धावांचा पाठलाग करताना 48 ओव्हर्समध्ये केवळ 260 धावाच करू शकला. बाबर आझम आणि खुशदिल शाह यांनी केलेली अर्धशतकी खेळी व्यर्थ गेली आहे. पाकिस्तानची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. 8 धावा झालेल्या असतानाच त्यांची पहिली विकेट गेली. 10 ओव्हर्समध्ये कमी धावा झाल्याने ती कसर पाकिस्तान भरून काढू शकला नाही. धावगटी वाढवण्याच्या नादात एक मागोमाग विकेट्स गेल्याने त्यांना होमपीचवर पराभव स्वीकारावा लागला आहे.
पाकिस्तानच्या छाताडावर बसून विल यंगने ठोकले शतक
विल यंगने एकदिवसीय क्रिकेटमधील त्याचे चौथे शतक झळकावले आहे. या ३२ वर्षीय फलंदाजाने १०७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यंगने आपला ४१ वा एकदिवसीय सामना खेळत पहिल्यांदाच न्यूझीलंडबाहेर शतक झळकावले. त्याने ११ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. यंगसाठी पाकिस्तान दौरा आतापर्यंत काही खास राहिला नाही. पुन्हा एकदा तो त्रिकोणी मालिकेतील तीन सामन्यांमध्ये २० धावा करण्यात अपयशी ठरला.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतके झळकावणारे न्यूझीलंडचे फलंदाज
१४५* – नॅथन अॅस्टल विरुद्ध अमेरिका, द ओव्हल, २००४
१०२* – ख्रिस केर्न्स विरुद्ध भारत, नैरोबी, २०००
१०० – केन विल्यमसन विरुद्ध ऑस्ट्रेलिया, एजबॅस्टन, २०१७
११२ – विल यंग विरुद्ध पाकिस्तान, कराची, २०२५
फखर झमानवर लागला 20 मिनिटांचा बॅन
ICCC च्या नियमामुळे फखर झमानला २० मिनिटे फलंदाजीसाठी पाठवण्यात आले नाही. नियमांनुसार, जर एखादा खेळाडू क्षेत्ररक्षणादरम्यान निर्धारित वेळेपेक्षा जास्त काळ मैदानाबाहेर राहिला तर त्याला फलंदाजीदरम्यानही काही काळ मैदानाबाहेर राहावे लागते. या नियमानुसार, पाकिस्तानच्या फलंदाजीदरम्यान फखर झमानला २० मिनिटे बाहेर बसावे लागले. यामुळेच पाकिस्तानला सलामीला सलामीला पाठवावे लागले.