Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs BAN: ‘टीम इंडिया’ बांगलादेशला जाणार की नाही? तमीम इक्बाल म्हणाले…

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष तमीम इकबालने या सिरिजबाबत माहिती दिली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, तारखेमध्ये बदल केला जाऊ शकतो असे त्यांनी म्हटले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 21, 2026 | 04:32 PM
INDIA VS BANGLADESH SERIES

INDIA VS BANGLADESH SERIES

Follow Us
Follow Us:
  • सप्टेंबर महिन्यात भारत- बांग्लादेश सिरिज होण्याची शक्यता 
  • बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने दिली महत्वाची माहिती 
  • अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याची माहिती 
Bangladesh Cricket Vs India Series: आगामी काळात म्हणजेच सप्टेंबर महिन्यात बांग्लादेश आणि भारत यांच्यात सिरिज होणार होती. मात्र आता ही सिरिज सुरू होणार की नाही याबाबत अनिश्चितता दिसून येत आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यात सप्टेंबर महिन्यात तीन वनडे सिरिज आणि टी २० सिरिज खेळवली जाणार होती, मात्र आता हा दौरा होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने माहिती दिली आहे.

राजकीय तणाव आणि भारतीय संघाचे व्यस्त वेळापत्रक यामुळे हा दौरा कदाचित रद्द किंवा पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये नियोजित असलेला हा दौरा आता सप्टेंबर महिन्यापर्यन्त पुढे गेला होता. मात्र अद्याप बीसीसीआय आणि बांग्लादेश क्रिकेट बोर्डामध्ये एकमत झाले नसल्याचे समजते आहे.

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष तमीम इकबालने या सिरिजबाबत माहिती दिली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, तारखेमध्ये बदल केला जाऊ शकतो असे त्यांनी म्हटले आहे. या सिरिजसंदर्भात बीसीसीआय आणि बांग्लादेश क्रिकेट बोर्डात बोलणी सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.

ग्रहण लागले! बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने घेतला ‘हा’ निर्णय; IND Vs BAN दौरा सापडला अडचणीत

भारत आणि बांग्लादेश सिरिजमध्ये आणखी देखील काही समस्या असल्याचे म्हटले जात आहे. बांग्लादेशने गेम डेवलपमेंट सिरिजची घोषणा केली आहे. ही सिरिज २८ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. त्यामुळे भारत बांग्लादेश सिरिज पुढे ढकलली जाऊ शकते. गेम डेवलपमेंट सिरिज मीरपूरमध्ये खेळवली जाणार आहे. जर भारत बांग्लादेश सिरिज होणार असल्याचे स्पष्ट झाले तर या सिरिजचे ठिकाण मीरपूरवरून दुसऱ्या ठिकाणी बदलले जाऊ शकते, असे इकबाल यांनी सांगितले.

भारत आणि बांग्लादेशच्या दौऱ्यात तीन टी 20 सामने आणि तीन वनडे सामने खेळवले जाण्याची शक्यता आहे. मात्र या दौऱ्याबाबत शंका निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय संघ बांग्लादेश दौऱ्यावर जाणार अशी चर्चा सुरू होती.

AUS Vs BAN: कांगारूंना लयं पळवलं! घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया अडचणीत, तंजिद हसनने…

मात्र समोर आलेल्या माहितीनुसार, बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने या दौऱ्यात मिडिया राईट्स विक्रीच्या प्रक्रियेवर अचानक बंदी आणल्याचे समजते आहे. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने 2026-27 च्या प्रस्तावित दौऱ्यासाठी मीडिया राईट्ससाठी टेंडर काढण्याचे जाहीर केले होते. ज्यामध्ये भारत अन् बांग्लादेश मालिकेचा समावेश होता.

Web Title: India vs bangladesh series bcb and bcci chance to postpond in september 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 04:32 PM

Topics:  

  • bcci
  • IND VS BAN
  • india vs Bangladesh

संबंधित बातम्या

श्रीलंका दौऱ्यानंतर Ajit Agarkar ची खुर्ची जाणार? BCCI घेणार भवितव्याचा निर्णय; रोहित शर्मा वादाचीही होणार चर्चा?
1

श्रीलंका दौऱ्यानंतर Ajit Agarkar ची खुर्ची जाणार? BCCI घेणार भवितव्याचा निर्णय; रोहित शर्मा वादाचीही होणार चर्चा?

Live सामन्यादरम्यान गर्लफ्रेंडला केला मेसेज अन् बसला लाखोंचा फटका; तमिळनाडूच्या क्रिकेटपटूवर BCCIची कारवाई, नेमकं काय घडलं?
2

Live सामन्यादरम्यान गर्लफ्रेंडला केला मेसेज अन् बसला लाखोंचा फटका; तमिळनाडूच्या क्रिकेटपटूवर BCCIची कारवाई, नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.