Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India vs Ireland: भारत विरूद्ध आयर्लंड T20 सामन्याची बदलली वेळ, अचानक काय घडले?

भारत आणि आयर्लंड यांच्यात २६ आणि २८ जून रोजी दोन T20 आंतरराष्ट्रीय सामने होणार आहेत. मालिका सुरू होण्याच्या अगदी आधी, क्रिकेट आयर्लंडने सामन्यांचे वेळापत्रक बदलले आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 25, 2026 | 07:58 PM
भारताचा आयर्लंडचा दौरा (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

भारताचा आयर्लंडचा दौरा (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • भारत विरूद्ध आयर्लंड पहिला टी२० सामना 
  • अचानक का बदलली वेळ 
  • कधी आणि कुठे पाहता येणार सामना 
टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर पोहोचला आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी होणार आहे. त्याआधी सामन्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. याआधी दोन्ही सामने स्थानिक वेळेनुसार दुपारी २.३० आणि भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार होते. सामन्याची सुरुवात एक तासाने पुढे ढकलण्यात आली आहे. आता दोन्ही सामने भारतात संध्याकाळी 6 वाजता सुरू होतील.

भारत-आयर्लंड T20 सामन्याची वेळ का बदलली?

महिला टी-20 विश्वचषकाचे सामनेही भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होत आहेत. हे लक्षात घेऊन भारत आणि आयर्लंड यांच्यातील सामन्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आयर्लंड क्रिकेटने ही माहिती दिली आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिला T20 सामना 26 जूनला तर दुसरा सामना 28 जूनला खेळवला जाणार आहे. दोन्ही सामने बेलफास्ट येथील सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लबमध्ये खेळवले जातील.

IND vs IRE: भारतीय संघाचे पहिले घमासान! शुक्रवारी देणार Ireland ला टक्कर, कधी आणि कुठे दिसणार Live Streaming

भारत आणि आयर्लंड दरम्यान होणाऱ्या टी20 सिरिजचे शेड्युल

सामना

तारीख मैदान

वेळ (IST)

पहिली टी20I

26 जून 2026 सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लब, बेलफास्ट संध्याकाळी 6:00 वाजता
दुसरी टी20I 28 जून 2026 सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लब, बेलफास्ट

संध्याकाळी 6:00 वाजता

आयर्लंडमधील स्थानिक वेळेनुसार दोन्ही सामने दुपारी १:३० वाजता सुरू होतील. नाणेफेक दुपारी १ वाजता होईल. मात्र, भारतातील वेळा वेगळ्या असतील. दोन्ही सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी ६ वाजता सुरू होतील.

कुठे पाहता येणार – भारत विरुद्ध आयर्लंड टी२० आंतरराष्ट्रीय सामने भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केले जातील. सोनी लिव्ह ॲप आणि वेबसाइटवरही थेट प्रक्षेपण (लाइव्ह स्ट्रीमिंग) उपलब्ध असेल

रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने

महिला टी-२० विश्वचषकाच्या एका महत्त्वपूर्ण सामन्यासाठी भारतीय महिला संघही रविवारी मैदानात उतरणार आहे. हरमनप्रीत कौर आणि तिचा संघ ऑस्ट्रेलियाचा सामना करतील. उपांत्य फेरीच्या शर्यतीसाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. आतापर्यंत भारताच्या गटातील कोणताही संघ उपांत्य फेरीत पोहोचलेला नाही. भारत आणि ऑस्ट्रेलियासोबतच दक्षिण आफ्रिकाही या शर्यतीत आहे.

भारतीय संघ आयर्लंडकडून कधीही पराभूत झालेला नाही

भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिला सामना २००७ मध्ये झाला होता. आतापर्यंत हे दोन्ही संघ ११ सामन्यांमध्ये आमनेसामने आले असून, त्या सर्व सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. या मालिकेत भारतीय संघाला प्रबळ दावेदार मानले जात आहे. मार्चमध्ये टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाची ही पहिलीच टी-२० मालिका आहे.

IND vs IRE: भारतीय टीमला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू दौऱ्यातून बाहेर; कोण घेणार जागा?

दोन्ही संघांमधील खेळाडूंची नावे 

भारतीय T20I संघः श्रेयस अय्यर (कर्णधार), अक्षर पटेल, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सैमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, वाशिंगटन सुंदर, शिवम् दुबे, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह, रवि बिश्नोई, प्रिंस यादव, हर्षित राणा, सुयश शेडगे

आयर्लंड T20I संघः लोर्कन टकर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), जॉर्ज डोकरेल, स्टीफन दोहनी (यष्टीरक्षक), हॅरी टेक्टर, गॅरेथ डेलानी, बेन कॅलिटज, टिम टेक्टर, रॉस अडेर, मॅथ्यू हम्फ्रेस, गोविन होए, लियाम मॅकार्थी, रुबेन विल्सन, जय मुंद्रा, मॅथ्यू होलार्ड

Web Title: India vs ireland t20 match timing change after womens t20 world cup 2026 match timing clashes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 07:58 PM

Topics:  

  • ind vs ire
  • indian cricket team
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

India Vs Ireland मध्ये कधी खेळवला गेला शेवटचा सामना? रोहित शर्माने केल्या होत्या ‘इतक्या’ रन्स
1

India Vs Ireland मध्ये कधी खेळवला गेला शेवटचा सामना? रोहित शर्माने केल्या होत्या ‘इतक्या’ रन्स

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशी इंग्लंडमध्ये भारतीय ड्रेसिंग रूम वापरणार नाही? वयामुळे बंधन, काय आहे नियम
2

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशी इंग्लंडमध्ये भारतीय ड्रेसिंग रूम वापरणार नाही? वयामुळे बंधन, काय आहे नियम

‘बेबी बॉस’ साठी स्पेशल ट्रीटमेंट; इंग्लंड दौऱ्यात Vaibhav Sooryvanshi ला मिळणार स्वतंत्र रूम?
3

‘बेबी बॉस’ साठी स्पेशल ट्रीटमेंट; इंग्लंड दौऱ्यात Vaibhav Sooryvanshi ला मिळणार स्वतंत्र रूम?

IND vs IRE: भारतीय संघाचे पहिले घमासान! शुक्रवारी देणार Ireland ला टक्कर, कधी आणि कुठे दिसणार Live Streaming
4

IND vs IRE: भारतीय संघाचे पहिले घमासान! शुक्रवारी देणार Ireland ला टक्कर, कधी आणि कुठे दिसणार Live Streaming

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.