Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs PAK: FIH Pro league मध्ये भारताने पाकिस्तानचा उडवला धुव्वा; ७-१ ने ऐतिहासिक विजय

India Beat Pakistan in FIH hockey League by 7-1: भारतीय पुरुष हॉकी संघाने एफआयएच प्रो लीग २०२५-२६ मध्ये पाकिस्तानला ७-१ ने पराभूत करून दणदणीत कामगिरी केली. या विजयासह भारताने पाकिस्तानवर आपला सलग १७ वा विजय नोंदवला आणि गुणतालिकेत सातव्या स्थानावर झेप घेतली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 27, 2026 | 02:50 PM
photo - social media

photo - social media

Follow Us
Follow Us:
  • भारताने पाकिस्तानचा उडवला धुव्वा
  • ७-१ ने ऐतिहासिक विजय
  • सामन्यावर पूर्णपणे भारताचे वर्चस्व
भारतीय पुरुष हॉकी संघाने एफआयएच प्रो लीग ( FIH Pro league) २०२५-२६ मध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ७-१ ने पराभूत करून शानदार कामगिरी केली. शुक्रवारी लंडन येथील ली व्हॅली हॉकी आणि टेनिस सेंटरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात, सुरुवातीला एका गोलने मागे पडल्यानंतर, भारताने जोरदार पुनरागमन करत पाकिस्तानला सामन्यातून पूर्णपणे बाहेर काढले. दोन दिवसांपूर्वी ४-३ असा निसटता विजय मिळवल्यानंतर, भारतीय संघ या सामन्यात अधिक आक्रमक दिसला.भारताकडून सुखजीत सिंग, हरमनप्रीत सिंग , हार्दिक सिंग, जुगराज सिंग, अभिषेक, राजकुमार पाल आणि दिलप्रीत सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल हार्दिक सिंगला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

FIFA World Cup 2026 मध्ये मोठा उलटफेर! अवघ्या 5 लाख लोकसंख्येच्या केप व्हर्डेची नॉकआऊटमध्ये धडक; आता अर्जेंटिनाचे आव्हान

सामन्यावर पूर्णपणे भारताचे वर्चस्व

दोन्ही संघांनी सामन्याची सुरुवात आक्रमकपणे केली. भारताला पहिल्या दोन मिनिटांतच पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण त्यांना त्याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. त्यानंतर पाकिस्तानने प्रतिहल्ल्याचा फायदा उचलला आणि १३ व्या मिनिटाला कर्णधार अबू बकर महमूदने ड्रॅग फ्लिकद्वारे पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून आपल्या संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पाकिस्तानने पहिल्या क्वार्टरमध्ये ही आघाडी कायम ठेवली.

सुखजीत सिंग (१९ व्या मिनिटाला), कर्णधार हरमनप्रीत सिंग (२६ व्या मिनिटाला), हार्दिक सिंग (३४ व्या मिनिटाला, पेनल्टी स्ट्रोक), जुगराज सिंग (३५ व्या मिनिटाला), अभिषेक (४१ व्या मिनिटाला), राजकुमार पाल (४३ व्या मिनिटाला) आणि दिलप्रीत सिंग (५३ व्या मिनिटाला) यांनी भारतासाठी प्रत्येकी एक गोल केला. दुसरीकडे, अबू महमूदने १३ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवरून पाकिस्तानसाठी एकमेव गोल केला.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने सामन्याचे चित्र पालटले

भारतीय संघाने दुसऱ्या क्वार्टरमध्ये दमदार कमबॅक केले. २० व्या मिनिटाला सुखजीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीत सिंगच्या ड्रॅग-फ्लिकला उत्कृष्टपणे अडवून १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर २६ व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने दुसऱ्या पेनल्टी कॉर्नरवर आत्मघाती गोल करून भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत भारतीय संघाने सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले होते. हार्दिकने ३४ व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर गोल केला, तर पुढच्याच मिनिटाला जुगराज सिंगने एक शानदार फील्ड गोल करून स्कोअर ४-१ असा केला. त्यानंतर अभिषेक, राजकुमार पाल आणि दिलप्रीत सिंग यांनी गोल करून भारताला ७-१ असा एकतर्फी विजय मिळवून दिला. शेवटच्या मिनिटांमध्ये पाकिस्तानला सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, परंतु भारतीय डिफेन्सने ते रोखून सामना आपल्या नावावर केला.

गुणतालिकेत भारताची आघाडी

या विजयानंतर, भारताने १५ सामन्यांतून १७ गुणांसह गुणतालिकेत सातवे स्थान पटकावले आहे. भारताने स्पेनला (१६ गुण) मागे टाकले आहे. दुसरीकडे, पाकिस्तान १५ सामन्यांत सलग १५ व्या पराभवाला सामोरे जात गुणतालिकेत शेवट्च्या स्थानी असून, त्यांना अद्याप एकही गुण मिळालेला नाही.

FIFA World Cup 2026 दरम्यान ‘या’ दिग्गज खेळाडूने घेतला संन्यास; वर्ल्ड रेकॉर्डसह कारकिर्दीला दिला पूर्णविराम

Web Title: India vs pakistan hockey fih pro league 2025 india beat pakistan 7 1 historic win marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • Hockey
  • Hockey Team India
  • IND VS PAK
  • Indian Men's Hockey Team

संबंधित बातम्या

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी टीमने लावला विजयाचा चौकार, जपानला नमवून सेमीफायनलमध्ये भरारी
1

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी टीमने लावला विजयाचा चौकार, जपानला नमवून सेमीफायनलमध्ये भरारी

Asian Games: पाकड्यांना दाखवला इंगा! टेबल टेनिसमध्ये भारताने उडवला लाज काढणारा धुव्वा
2

Asian Games: पाकड्यांना दाखवला इंगा! टेबल टेनिसमध्ये भारताने उडवला लाज काढणारा धुव्वा

Hockey India : हॉकी इंडियाकडून सविता पूनियाला 10 लाखांचे बक्षिस, ‘हे’ आहे कारण….
3

Hockey India : हॉकी इंडियाकडून सविता पूनियाला 10 लाखांचे बक्षिस, ‘हे’ आहे कारण….

Asian Games : आता महिला हॉकी संघाने इंडोनेशियाचा केला गेम! 17-1 ने दणदणीत विजय
4

Asian Games : आता महिला हॉकी संघाने इंडोनेशियाचा केला गेम! 17-1 ने दणदणीत विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.