नवी दिल्ली – भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना तिरुअनंतपुरममध्ये सुरु आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकन संघांना अवघ्या १४ धावांत ५ धक्के बसले आहेत. १५ षटकानंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर ६८/७ असा आहे. दिपक चहरने २ तर अर्शदीपने ३ बळी घेतले.
भारतीय संघात चार बदल करण्यात आले आहेत. भुवनेश्वर कुमारच्या जागी दीपक चहरला संधी मिळाली आहे. त्याचवेळी हार्दिक पंड्याच्या जागी ऋषभ पंत प्लेइंग इलेव्हनचा भाग बनला आहे. युझवेंद्र चहलच्या जागी आर.अश्विन आणि अर्शदीप सिंगचेही पुनरागमन झाले आहे.






