फोटो सौजन्य - Social Media
झी मराठीवर सर्वात जास्त पाहिल्या जाणाऱ्या मालिकेपैकी एक मालिका म्हणजे ‘लक्ष्मी निवास’! या मालिकेचा चाहतावर्ग फार मोठा आहे. आणि याच चाहत्यावर्गामुळे मालिकेची जुनी ‘सिंचना’ म्हणजेच तन्वी कोलतेला बिग बॉस मराठीच्या Season 6 मध्ये जाण्याची संधी मिळाली. पण बिग बॉसमुळे तन्वीला मालिकेतून Exit घ्यावी लागली होती. आता तिने साकारलेल्या पात्राला नवा चेहरा मिळाला आहे. तन्वीने मालिकेतून Exit घेतल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री धनश्री पाटील ‘सिंचना’ या पात्राची धुरा सांभाळणार आहे.
कोण आहे अभिनेत्री धनश्री पाटील?
अभिनेत्री धनश्री पाटील बहुगुणी कलाकार आहे. तिने भा2पाच्या ट्रॅव्हल शोसाठी होस्ट केलं आहे. ती एक उत्तम अँकर, डान्सर, इंटरटेनर तसेच उत्तम अभिनेत्रीदेखील आहे. तिचा सोशल मीडियावर चाहतावर्गही फार मोठा आहे. मालिकेत धनश्रीच्या एंट्रीने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. काही मालिकेच्या चाहत्यांना सिंचना या भूमिकेसाठी तन्वीच उत्तम असल्याचे वाटत आहे तर धनश्रीच्या चाहत्यांनी तिला तिच्या या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
तन्वी कोलतेने का सोडली मालिका?
धनश्रीच्या आधी तन्वी या पात्राला साकारत होती. तन्वी आता बिग बॉस मराठी Season 6 मध्ये स्पर्धक म्हणून खेळत आहे. तिला संपूर्ण महाराष्ट्र भरातून प्रेम मिळत आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तन्वी हळूहळू महाराष्ट्रातील मराठी तरुणांची क्रश बनत चालली आहे. तन्वीने पहिल्याच आठवड्यात बिग बॉस मराठी season 6 च्या प्रेक्षकांच्या नजरेत स्थान मिळवले आहे कारण ती पहिल्याच आठवड्यात जास्त दिसून आलेल्या स्पर्धकांपैकी एक आहे.
धनश्री आता या भूमिकेला न्याय देऊ शकते का? याकडे प्रेक्षकांचे लक्ष तर राहणारच आहे. तसेच बिग बॉस मराठीमधील तन्वीच्या खेळाकडेही प्रेक्षकांचे विशेष लक्ष आहे.






